'गंगुबाईला' मोठा झटका, चित्रपट ऑनलाईन झाला लिक

ज्या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होते त्या गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Alia Bhatt
Alia Bhatt

Gangubai Kathiawadi Leaked - ज्या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होते त्या गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आलिया भट्ट(Alia Bhatt) , अजय देवगण(Ajay Devgn) यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलियाच्या गंगुबाईच्या लूकला चाहत्यांनी भरभरून दाद दिली होती. त्याला मिळालेला प्रतिसाद गंगुबाईनं पहिल्या दिवसापासून थिएटरमध्ये गर्दी खेचण्यास सुरुवात केली. मात्र हा चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित झाल्यानं निर्मात्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आज गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र काही वेळातच तो ऑनलाईन देखील व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये तमिळ रॉकर्सनं हा मुव्ही लिक केला आहे. यापूर्वी देखील काही बिग बॅनर चित्रपट अशा पद्धतीनं ऑनलाईन लिक झाल्यानं निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाराजी व्यक्त केली होती. भन्साळी यांच्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्याच्यातील काही दृश्यांवरून कोर्टामध्ये वाद देखील सुरु होता. मात्र न्यायालयानं प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवत निर्माते आणि दिग्दर्शक यांना दिलासा दिला होता. दुसरीकडे हा चित्रपट ऑनलाईन लिक झाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Alia Bhatt
Piff 2022: मराठी चित्रपटांची पर्वणी, ‘नेबर्स’ Opening Movie

चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी मध्ये गंगुबाईचा खडतर प्रवास मांडण्यात आला आहे. तिच्या वाट्याला आलेला संघर्ष, त्यातून तिनं वेश्य़ांसाठी केलेलं सामाजिक काम, याची दखल यानिमित्तानं घेण्यात आली आहे. मुंबईतील कामाठीपुरा भागात राहणाऱ्या गंगुबाईनं आपल्या कामानं वेगळी ओळख निर्माण केली होती. तिचा त्या भागात दरारा तयार झाला होता. करिम लालाची मिळालेली साथ याच्या जोरावर तिनं कामाठीपुऱ्यात दबदबा तयार केला. अनेक वर्ष तो कायमही होता. माफिया क्वीनमध्ये गंगुबाईच्या आयुष्यावर हुसैन झैदी यांनी प्रकाश टाकला आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंगुबाईच्या नावाची चर्चा या चित्रपटाच्या निमित्तानं सुरु होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com