esakal | Video : दहा वर्षात एक 'सैराट' बनून काय उपयोग? गश्मीर महाजनीची रोखठोक भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

gashmir mahajani

मराठी चित्रपटांच्या कथानकाविषयी व त्यातील कलाकारांविषयी गश्मीरने मांडली भूमिका

Video : दहा वर्षात एक 'सैराट' बनून काय उपयोग? गश्मीर महाजनीची रोखठोक भूमिका

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठीसोबतच हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' या आगामी चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. शिवजयंतीनिमित्त गश्मीरचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. यावेळी 'सकाळ ऑनलाइन'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत गश्मीर बऱ्याच मुद्द्यांवर मोकळेपणाने व्यक्त झाला. 

मराठी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश का मिळत नाही, यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत असा प्रश्न गश्मीरला विचारण्यात आला. त्यावर गश्मीरने काय उत्तर दिलं ते पाहा- 

हेही वाचा : 'सोशल मीडियावर जाहीर चर्चा नको'; मंदार देवस्थळी प्रकरणावरून अमेय खोपकरांचं आवाहन 

हेही वाचा : स्वाती आणि संग्राम अडकणार लग्नबंधनात; पण हे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का?

चित्रपटासोबतच गश्मीर वेब व मालिकाविश्वातही सक्रिय आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'इमली' या हिंदी मालिकेत तो आदित्य या पत्रकाराची भूमिका साकारत आहे. तर दुसरीकडे त्याची 'श्रीकांत बशीर' ही वेब सीरिजसुद्धा चांगलीच गाजली. या वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.