मुलासोबत काढलेला अभिनेता गश्मीर महाजनीचा फोटो झाला व्हायरल

टीम इ सकाळ
रविवार, 18 जून 2017

मुंबई : रविवारी फादर्स डे असल्यामुळे अनेक कलाकारांनी आपल्या वडिलांसोबतचे फोटो सोशल साईटवर टाकले. यात श्रेया बुगडे, वैभव तत्त्ववादी, प्रियांका चोप्रा आदी कलाकारांचा समावेश होतो. पण मराठी सोशल मिडीया गाजला तो अभिनेता गश्मीर महाजनीच्या फोटोमुळे. गश्मीर हा रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे हे तर सर्वांना माहीत आहेच. पण त्याने आपल्या मुलाचा फोटो टाकून सर्वांना गोड धक्का दिला. 

त्याच्या या धक्क्यामुळे अनेक मुलींची ह्रदये तुटली असणार यात शंका नाही. त्याचा हा फोटो लगेच व्हायरल झाला. या फोटो निमित्ताने महाजनी घराण्याची तिसरी पिढी लोकांसमोर आल्याने आनंदही व्यक्त होताना दिसला. या टि्वटमध्ये गश्मीर म्हणतो, फादर्स डे च्या निमित्ताने तू मला खूप गोष्टी शिकवल्यास. अनेक गोष्टींचे महत्व मी जाणले. मला तुझी उणीव सतत भासते.

अनेकांना हा फोटो म्हणजे प्रमोशनचा भाग आहे असेही वाटू लागले आहे. कारण पण एकूण फोटो आणि त्यावर असलेला मेसेज पाहता हा गश्मीरचा मुलगाच असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.  

Web Title: Gashmir Mahajani with son esakal news