esakal | Video : इफ्तारच्या प्रतीक्षेत भूकेने व्याकूळ झाली गौहर खान

बोलून बातमी शोधा

Gauhar Khan

Video : इफ्तारच्या प्रतीक्षेत भूकेने व्याकूळ झाली गौहर खान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. पती झैदसोबतचे डान्सचे व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकताच गौहरने एक भन्नाट विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौहर भुकेने व्याकुळ झालेली दिसत आहे.

व्हिडीओमध्ये गौहरने हिजाब परिधान केला आहे. ती इफ्तारची वाट बघतेय असे दिसत आहे. तिला खूप भूक लागली आहे असे ती तिच्या हावभावांनी सांगत आहे. गौहरने हा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिले, ‘माझ्या या व्हिडीओशी कोण कोण रिलेट करू शकतं? हाहाहा….या ट्रेंडला रमजान 2021 मध्ये करायलं हवं. मजेदार आहे, परंतु सत्य आहे. तुम्ही स्वतःच्या कोणत्या आवडत्या पदार्थाने रोजा सोडता? खजूर की पाणी?’. गौहरच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. अनेकांनी कमेंट करून ते रोजा कोणता पदार्थ खाऊन सोडतात ते गौहरला सांगितले आहे. ‘गौहर हिजाबमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेस‘ अशी कमेंट गौहरच्या एका चाहत्याने केली आहे.

हेही वाचा : सेलिब्रिटींच्या 'मालदीव व्हेकेशन'वरून मीम्स व्हायरल

मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरू आहे. रमजानच्या काळात दिवसभर उपवास ठेवल्यानंतर संध्याकाळी खाऊन रोजा सोडला जातो, त्याला इफ्तार असं म्हणतात.