Gaurav More: हास्यजत्रा फेम गौरव मोरेनं शेअर केला राज ठाकरेंचा व्हिडीओ; म्हणाला...

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनं (Gaurav More) राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Gaurav More,Raj Thackeray
Gaurav More,Raj ThackeraySakal

Gaurav More: काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर (Maharashtra Bhushan Puraskar) झाल्यानंतर अनेकांनी अशोक सराफ यांच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. अशताच नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनं (Gaurav More) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे अशोक सराफ यांचे कौतुक करताना दिसत आहेत.

गौरव मोरेनं शेअर केला व्हिडीओ

गौरव मोरेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे म्हणतात, "मी त्यांचे व्हॅक्यूम क्लिनर हे नाटक पाहिले. त्या नाटकात अशोक सराफ यांची एन्ट्री झाली आणि त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. अशोक सराफ हे जर दक्षिणेत असते, तर ते मुख्यमंत्री आज असते. त्यांच्या 40 फूटाच्या कटआऊटवर लोकांनी दूध टाकलं असतं. अशोक सराफ हा दागिना फक्त सराफांच्या घरात मिळू शकतो." गौरव मोरेनं राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "वा!" (Gaurav More shared the video)

Gaurav More
Gaurav MoreSakal

अशोक सराफ यांचे चित्रपट

अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं. काही दिवसांपूर्वी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. आयत्या घरात घरोबा,आमच्या सारखे आम्हीच,नवरी मिळे नवऱ्याला,अशी ही बनवाबनवी या अशोक सराफ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच अशोक सराफ यांनी कोयला, जोरू का गुलाम,गुप्त आणि सिंघम या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

गौरव मोरे हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. गौरवचा लंडन मिसळ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com