esakal | जेनेलिया वहिनी पोहोचल्या दिरांचे उमेदवारी अर्ज भरायला! 
sakal

बोलून बातमी शोधा

genelia deshmukh attends brother in law nomination filling rally at latur

'काल अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरायला जाताना मी लातूरमधल्या लोकांचा उत्साह, त्यांचे आमच्या कुटूंबाप्रती प्रेम बघितले. मला अभिमान वाटतो की मी या कुटूंबाचा भाग आहे. अमित भैय्या आणि धीरज यांना शुभेच्छा! हे दोघेजण लातूरचे खरे नेतृत्व आहे.' 

जेनेलिया वहिनी पोहोचल्या दिरांचे उमेदवारी अर्ज भरायला! 

sakal_logo
By
टीम ईसकाळ

लातूर : माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या लातूरातील दोन विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र अमित देशमुख व धीरज देशमुख निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचा विजय असलेल्या या दोन मतदारसंघातून काल या दोन भावांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासह त्यांचे कुटूंबियही उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुखही उपस्थित होते. अमित-धीरजीची वहिनी जेनेलिया दिरांचे उमेदवारी अर्ज भरताना हिरीरीने पुढे होती.

अमित देशमुख लातूर शहर विधानसभा मतदारसंघ तर धीरज देशमुख लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे देशमुख बंधूंनी एकत्र उमेदवारी अर्ज भरत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांचे सर्व कुटूंबिय उपस्थित होते. त्यांच्या कुटूंबाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत म्हणले आहे की, 'काल अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरायला जाताना मी लातूरमधल्या लोकांचा उत्साह, त्यांचे आमच्या कुटूंबाप्रती प्रेम बघितले. मला अभिमान वाटतो की मी या कुटूंबाचा भाग आहे. अमित भैय्या आणि धीरज यांना शुभेच्छा! हे दोघेजण लातूरचे खरे नेतृत्व आहे.' 

Vidhan Sabha 2019 : ...आता वेळ आली ती धीरजला घडविण्याची : रितेश देशमुख

अमित-धीरजचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्या मातोश्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, काका दिलीप देशमुख, अमितची पत्नी अदिती प्रताप, धीरजची पत्नी दिपशिखा, रितेश-जेनेलिया, त्यांची मुलं असा सगळा परिवार उपस्थित होता.  

रितेशची सरकारवर टीका 
अर्ज दाखल केलेल्यानंतर आयोजित सभेत रितेशने सरकारवर कडाडून टीका केली. रितेश म्हणाला, मी अभिनेता आहे, जेव्हा जाहिरात करायची असते, मुलाखत द्यायची असते, तेव्हा आम्ही मेकअप करतो. सरकारच्या रस्त्यात अनेक खड्डे आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी मेकअप करण्यात येईल. परंतु, एक लक्षात ठेवा मेकअप कितीही चांगला असला तरी तो उतरला की खरा चेहरा समोर येतो. असाच मेकअप या सरकारने केला आहे. मेकअप हटविला की, यांचा खरा चेहरा समोर येणार, अशा शब्दांत रितेशने भाजपचा समाचार घेतला.