'घाडगे & सून' ही मालिका आता नव्या वळणावर

बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

अमृता आणि अक्षय दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली असून ही मैत्री मैने प्यार किया मधील सुमन आणि प्रेमच्या मैत्रीची आठवण करून देते. जशी त्या दोघांमधील मैत्री ही निस्वार्थी आणि निर्मळ होती तशीच अक्षय आणि अमृतामधील मैत्री आहे असे नक्कीच प्रेक्षकांना वाटेल यात शंका नाही. पण सुमन आणि प्रेम जसे अनेक अडचणीना तोंड देऊन, लग्न बंधनामध्ये बांधले गेले तसे अमृता आणि अक्षय पण आपलं लग्नाचं नातं टिकवू शकतील कि अक्षय अमृताला कायमचे सोडून कियाराला स्वीकारेल हे जाणून घेण्यासाठी बघत रहा तुमची आवडती मालिका घाडगे & सून सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर. 

मुंबई : घाडगे & सून मालिकेत अक्षय आणि अमृताचे लग्न कुठल्या परिस्थितीत झाले हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अक्षयने अमृताला वचन देखील दिले कि तो तिला काही महिन्यामध्येच या लग्नबंधनामधून मुक्त करेल. दुसरीकडे अमृता माईना मनविण्यासाठीच सगळे प्रयत्न करते आहे. परंतु लग्न झाल्यापासून अक्षय कियाराच्या शोधात
आहे. अमृताला ही गोष्ट माहिती असून ती अक्षयला लागेल ती मदत देखील करते आहे. या सगळ्या प्रकारणामधून अक्षय आणि अमृतामध्ये आता मैत्रीचं नव नातं निर्माण होत आहे. पण आता अक्षयचा शोध संपणार आहे कारण कियारा लवकरच परतणार आहे. कियाराच्या परतण्याने अक्षय आणि अमृताची मैत्री तशीच राहील का? अक्षय अमृताला लग्नबंधनामधून मुक्त करेल का ? अमृता अक्षयला कियाराला घाडगे परिवारामध्ये आणण्यात मदत करेल का ? हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.

अमृता आणि अक्षय दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली असून ही मैत्री मैने प्यार किया मधील सुमन आणि प्रेमच्या मैत्रीची आठवण करून देते. जशी त्या दोघांमधील मैत्री ही निस्वार्थी आणि निर्मळ होती तशीच अक्षय आणि अमृतामधील मैत्री आहे असे नक्कीच प्रेक्षकांना वाटेल यात शंका नाही. पण सुमन आणि प्रेम जसे अनेक अडचणीना तोंड देऊन, लग्न बंधनामध्ये बांधले गेले तसे अमृता आणि अक्षय पण आपलं लग्नाचं नातं टिकवू शकतील कि अक्षय अमृताला कायमचे सोडून कियाराला स्वीकारेल हे जाणून घेण्यासाठी बघत रहा तुमची आवडती मालिका घाडगे & सून सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर. 

Web Title: ghadage and soon serial colors marathi new turn esakal news

टॅग्स