Ghar Banduk Biryani: प्रदर्शन लांबणीवर! आता 'या' दिवशी निघणार जाळ धूर आन धमाका संगटच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ghar Banduk Biryani

Ghar Banduk Biryani: प्रदर्शन लांबणीवर! आता 'या' दिवशी निघणार जाळ धूर आन धमाका संगटच..

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा भन्नाट टिझर काही महिन्यांपूर्वी रिलिज झाला होता. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक, पळापळी यात दिसत होती.

त्यामुळे नेमके या चित्रपटात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार होती. हा चित्रपट येत्या ३० मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र आता या चित्रपटाची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

नागराज यांनी पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीखेबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. ३० मार्च रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता मात्र आता एका आठवडा उशीरा म्हणजेच ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे दर्जेदार चित्रपट दिले आहेत.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे ‘घर बंदूक बिरयानी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे तर चाहतेही चित्रपट पाहण्यासाठी उत्सूक आहेत मात्र आता चाहत्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.