Urfi javed Video: कपडे सुकवायचे चिमटे चोरीला! उर्फी तर नाय घेवून गेली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

urfi javed Video

Urfi javed Video: कपडे सुकवायचे चिमटे चोरीला! उर्फी तर नाय घेवून गेली?

फॅशन सेन्सेशन उर्फी जावेदने हिने पुन्हा तिच्या फॅशनचा सेन्स दाखवण्यासाठी सज्ज आहे. व्हॅलेंटाईन डे च्या अगोदरचं तिने पुन्हा एकदा तिची शैली दाखवली आहे. उर्फी जावेदचे कपडे सुकलेले नव्हते त्यामुळे तिने कपडे सुकवण्याच्या चिमट्यापासूनच नवीन ड्रेस बनवला. असं काहीसं तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

उर्फी जावेद शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सौंदर्य दाखवलं आहे. उर्फी जावेदची ही अक्कल पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर चाहत्यांना तिने एक खास कॅप्शनही दिलं आहे.

उर्फी जावेदने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिने तिचा नवीन ड्रेस दाखवला आहे. या व्हिडिओत ती सैल-फिटिंग असलेल्या केशरी रंगाच्या टी-शर्टमध्ये कपडे सुकवण्याच्या स्टँडजवळ उभी असलेली दिसते, नंतर ती त्या स्टँडवरील कपड्याचा चिमटा काढते, तेव्हाच तिच्या डोक्यात ट्यूब पेटते. त्यांनतर उर्फी कॅमेऱ्यासमोर टॉवेल हलवते आणि नंतर तिच्या नवीन फॅशनचा अविष्कार तायार होतो. उर्फीने कपडे सुकवण्याच्या चिमट्यापासून नवीन ड्रेस बनवला आणि तो परिधान केलेला दिसतो, व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'याला काहीतरी फनी कॅप्शन द्या' असं म्हटलं आहे.

त्यानंतर तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंटचा पाऊस पडलेला दिसतोय. काहींना उर्फी जावेदचा बोल्ड लूक आवडला तर काहींना तिची फॅशन पाहिल्यानंतर चक्कर आली. तसचं काहींनी तिला ट्रोलही केल आहे. एकानं लिहिलयं, तोच विचार करत होतो की, 'कपडे सुकवण्याचे चिमटे कुठे जात आहे..चोर पकडला गेला', तर एकानं म्हटलयं, 'उर्फी का कोई जवाब नही'.

आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत अनेक गोष्टींनी बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.