esakal | फुलाला सुगंध मातीचा: मालिकेत गिरीश ओक यांची एण्ट्री
sakal

बोलून बातमी शोधा

girish oak

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत गिरीश ओक यांची एण्ट्री

sakal_logo
By
स्वाती वेमूल

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा Phulala Sugandh Maticha मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत लवकरच परमेश्वर स्वरुप स्वामीजी यांची एण्ट्री झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक Girish Oak स्वामीजी यांची भूमिका साकारणार असून पहिल्यांदाच ते अश्या पद्धतीची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

या भूमिकेविषयी सांगताना गिरीश ओक म्हणाले, "मी याआधी अश्या पद्धतीचं पात्र रंगवलेलं नाही, त्यामुळेच भूमिका साकारताना मजा येतेय. मला वरकरणी जे दिसत नाहीत पण प्रत्यक्षात वेगळे असतात अशी पात्रं साकारायला आवडतात. याआधी मी बरीच सात्विक पात्रं साकारली आहेत. त्यामुळे फुलाला सुगंध मातीचा मालिकेत स्वामीजी साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. कोणतंही पात्र साकारताना त्याची लकब ही प्रेक्षकांच्या मनात कायम राहते आणि त्याला लोकप्रियता मिळते. मी हे पात्र साकारताना नवी लकब शोधून काढली आहे. प्रेक्षकांना हे पात्र आवडेल अशी आशा आहे. मी दिग्गज अभिनेते प्राण यांचा चाहता आहे. भूमिका रंगवताना ते त्या पात्राची प्रेक्षकांवर छाप सोडायचे. त्यामुळे नवी व्यक्तिरेखा साकारताना मी त्यांना डोळ्यासमोर ठेवतो."

हेही वाचा: BBM 3: 'हाच विजेता ठरणार'; प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असलेला हा स्पर्धक कोण?

हेही वाचा: वर्ल्ड कप ट्रॉफी अडवण्यापासून आर्यनच्या अटकेपर्यंत..समीर वानखेडे यांची कामगिरी

स्वामीजींच्या येण्याने कीर्तीसमोर मात्र नवं संकट उभं ठाकणार आहे. आता या संकटाचा सामना ती कशी करते हे मालिकेच्या आगामी भागात पाहणं औत्सुक्याचं ठरेल. फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

loading image
go to top