'तुझा नंबर दे..'असं म्हणत कपिलचं आगळं वेगळं निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 kapil sharma
'तुझा नंबर दे..'असं म्हणत कपिलचं आगळं वेगळं निमंत्रण

'तुझा नंबर दे..'असं म्हणत कपिलचं आगळं वेगळं निमंत्रण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सोनी टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे द कपिल शर्मा शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा शोचा आनंद जवळून घेण्याची अनेकांची इच्छा असते. पण सर्वसामान्यांच्या इच्छा सहजपणे पूर्ण होत नाही.मात्र एका युवकाने ट्विटच्या माध्यमातून आपली इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा पूर्ण देखील झालेली दिसून येत आहे.

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माने मनिष कुमार यांचं ट्विट वाचलं आणि त्यांना थेट आपल्या शोमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आहे. मनिष कुमार यांनी आपल्या मुलीसोबतचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये, मुंबईतील मरीन लाईनवर ते आपल्या लेकीसह पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. 'आम्ही २३ नोव्हेंबर रोजी मुंबईतून गावी निघणार आहोत. तत्पूर्वी, माझ्या लेकीला आपला शो लाईव्ह पाहायची खूप इच्छा आहे. माझ्या मुलीची ही पहिलीच मुंबई ट्रीप असून तिला तुमचा कार्यक्रम खूप आवडतो, तेव्हा माझ्या मुलीला आणि कुटुंबाला आपल्या कार्यक्रमाध्ये सहभागी होण्याची संधी द्यावी.' असं ट्विट करत मनिषने इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा: आमिर तिसऱ्यांदा करणार लग्न? अखेर सत्य आलं समोर..

मनिष यांच्या ट्वटिला कपिलने लगेच उत्तर देत, थेट शोमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आहे.'भावा, आम्ही उद्याच शूटींग करत आहोत, आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा, माझी टीम आपल्याशी संपर्क साधून शोमध्ये सहभागी करून घेईल.' असं उत्तर कपिलने मनिष यांना दिलं आहे. त्यामुळे, कपिलच्या पुढील काही दिवसांत होणाऱ्या शोमध्ये मनिष कुमार दिसणार का, त्याच्यासोबत त्यांची कन्या असेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

loading image
go to top