
Grammy 2022 : कोणाला मिळाला कोणता पुरस्कार, कोण आहेत हे दिग्गज..
संगीत क्षेत्रातला सर्वोच्च मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards 2022) सोहळ्याकडे पाहिले जाते. या सोहळ्यात संगीतक्षेत्रातील अनेक दिग्ग्जांना संगीतातील त्यांच्या योगदानासाठी पुरस्काराने गौरविले जाते. संगीत क्षेत्रातील मान्यवर आवर्जुन या सोहळ्याला उपस्थिती दर्शवतात. यंदा या सोहळ्याचे ६४वे वर्ष असून लास वेगास मधील एमजीएम (MGM) ग्रँड मार्की बॉलरूम येथे हा सोहळा पार पडला.
हेही वाचा: Grammy 2022 : भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह यांना ग्रॅमी..
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भारतीयांचे विशेष योगदान आहे. भारतीय रिकी केज आणि भारतीय वंशाच्या अमेरिकेत राहणाऱ्या फाल्गुनी शाह यांनी ग्रॅमी पुरस्कार पटकावले. हा पुरस्कार २० हुन अधिक श्रेणींमध्ये दिला जातो. देशभरातील संगीतकार हा पुरस्कार मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. यंदाच्या सोहळ्यात ज्या दिग्गजांना ग्रॅमी पुरस्कार प्राप्त झाला त्यांची ही नामावली...
अल्बम ऑफ द इयर ग्रॅमी: वी आर : जॉन बॅटिस्ट
सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार : ऑलिव्हिया रॉड्रिगो
रेकॉर्ड ऑफ द इयर : "लीव्ह द डोअर ओपन ": सिल्क सोनिक
सॉन्ग ऑफ द इयर : "लीव्ह द डोअर ओपन ": सिल्क सोनिक
सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स: "ड्रायव्हर्स लायसन्स": ऑलिव्हिया रॉड्रिगो
हेही वाचा: Grammy 2022 : अभिमानास्पद, भारताच्या रिकी केज यांना ग्रॅमी, नमस्ते करून..
सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम : "कॉल मी इफ यू गेट लॉस्ट": टायलर,
सर्वोत्कृष्ट रॅप गाणे : "जेल" कान्ये वेस्ट, जे-झेड
सर्वोत्कृष्ट रॅप परफॉर्मन्स: "फॅमिली टाईज": बेबी कीम, केंड्रिक लामर
सर्वोत्कृष्ट कन्ट्री अल्बम : "स्टार्टिंग ओव्हर": ख्रिस स्टॅपलटन
सर्वोत्कृष्ट रॉक गाण : "वेटिंग ऑन अ वॉर": फू फायटर्स
सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम: "मेडिसिन अॅट मिडनाईट": फू फायटर्स
सर्वोत्कृष्ट रॉक परफॉर्मन्स: “मेकिंग अ फायर” फू फायटर्स
सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बम: "अ कलरफुल वर्ल्ड": फालू
सर्वोत्कृष्ट जागतिक कामगिरी: पाकिस्तानी गायक अरुज आफताब "मोहब्बत"
सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम : मदर नेचर, अँग्लिक किडजो
सर्वोत्कृष्ट म्युझिकल थिएटर अल्बम : द अनऑफिशिअल ब्रिजरटन म्युझिकल
सर्वोत्कृष्ट आर अँड बी परफॉर्मन्स: "लीव्ह द डोअर ओपन ": सिल्क सोनिक आणि जॅझमिन सुलिव्हनचे "पिक अप युअर फीलिंग्ज"
सर्वोत्कृष्ट मेटल परफॉर्मन्स: "द एलियन": ड्रीम थिएटर
सर्वोत्कृष्ट पारंपारिक पॉप व्होकल अल्बम: "लव्ह फॉर सेल": टोनी बेनेट आणि लेडी गागा
सर्वोत्कृष्ट नृत्य/इलेक्ट्रॉनिक म्युझिक अल्बम: "सबकॉन्शसली": ब्लॅक कॉफी
सर्वोत्कृष्ट ऑल्टरनेटिव्ह संगीत अल्बम: "डॅडीज होम": सेंट व्हिन्सेंट
सर्वोत्कृष्ट समकालीन वाद्य अल्बम: "ट्री फॉल्स": टेलर इग्स्टी
सर्वोत्कृष्ट कॉमेडी अल्बम: लुई सीके
वर्षातील निर्माता ( क्लासिकल) : ज्युडिथ शर्मन
वर्षातील सर्वोत्कृष्ट निर्माता (नॉन - क्लासिकल): जॅक अँटोनॉफ
Web Title: Grammy 20222 Winnner
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..