पैशांपेक्षा भूमिका श्रेष्ठ! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

काय पो छे, क्वीन, सिटीलाईट्‌स, हमारी अधुरी कहाणी, डॉली की डोली, अलिगढ या सिनेमांमधला राजकमुमार राव हा गुडगावचा सुपस्टार सगळ्यांना चांगलाच लक्षात राहिला आहे. आपल्या सहज साध्या देहबोलीने तो अशी काही जादू करतो की बस्स. बघतच रहावं. अलिगढ सिनेमानंतर तो त्याच्या आगामी सिनेमातल्या भूमिकेकडे लक्ष देतोय. अलिकडेच तो असं म्हणाला की त्याला फक्त पैशासाठी सिनेमे करायचे नाहीत. त्याच्यासाठी भूमिका महत्त्वाची आहे. मी कधीही कमर्शियल सिनेमे करण्यासाठी धडपडत नाही. मला माझा अभिनय खूप मोलाचा आहे. बिग तिकीट सिनेमा करून स्टारडम मिळवावं, अशा प्रयत्नात मी नसतो.

काय पो छे, क्वीन, सिटीलाईट्‌स, हमारी अधुरी कहाणी, डॉली की डोली, अलिगढ या सिनेमांमधला राजकमुमार राव हा गुडगावचा सुपस्टार सगळ्यांना चांगलाच लक्षात राहिला आहे. आपल्या सहज साध्या देहबोलीने तो अशी काही जादू करतो की बस्स. बघतच रहावं. अलिगढ सिनेमानंतर तो त्याच्या आगामी सिनेमातल्या भूमिकेकडे लक्ष देतोय. अलिकडेच तो असं म्हणाला की त्याला फक्त पैशासाठी सिनेमे करायचे नाहीत. त्याच्यासाठी भूमिका महत्त्वाची आहे. मी कधीही कमर्शियल सिनेमे करण्यासाठी धडपडत नाही. मला माझा अभिनय खूप मोलाचा आहे. बिग तिकीट सिनेमा करून स्टारडम मिळवावं, अशा प्रयत्नात मी नसतो. एखादा छान सीन शूट केला की जो आनंद मिळतो तो आनंद पैशांच्या मागे धावण्यात नाही. अलीकडे असं बोलणारा एकमेव तूच राजकुमार. बाकी मानलं तुला राजकुमार. तुझ्या नावातच राजकुमार नाही. तू सिनेमातलाही राजकुमार आहेस... 
 

Web Title: Greater role than money!

टॅग्स