प्रियांकाच्या बिकिनीला बोर्डाचा हिरवा कंदील 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

'अलिकडे बिकिनी घालणे नवे उरले नाही. तुम्ही मालदिव, गोव्याला जाऊन बघा. तिथे सर्रास ती घातली जाते. त्यामुळे बिकिनीची दृश्‍ये कापायचा संबंधच येत नाही, असे सांगत सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सीबीएफसीचे चेअरमन पहलाज निहलानी यांनी बेवॉचच्या भारतातील सिनेआवृत्तीतील बिकिनी दृश्‍यास परवानगी दिली. 

मुंबई : 'अलिकडे बिकिनी घालणे नवे उरले नाही. तुम्ही मालदिव, गोव्याला जाऊन बघा. तिथे सर्रास ती घातली जाते. त्यामुळे बिकिनीची दृश्‍ये कापायचा संबंधच येत नाही, असे सांगत सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सीबीएफसीचे चेअरमन पहलाज निहलानी यांनी बेवॉचच्या भारतातील सिनेआवृत्तीतील बिकिनी दृश्‍यास परवानगी दिली. 

निहलानी यांच्या यापूर्वीच्या निर्णयामुळे बोर्ड वारंवार गोत्यात आले आहे. सनी लिऑनीपासून जरीन खानपर्यंत अनेकींच्या यापूर्वीच्या बिकिनी दृश्‍यांना पहलाज यांनी कात्री लावली आहे. त्याचवेळी मोठ्या बॅनरच्या अनेक चित्रपटांना त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. पहलाज यांच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरू होण्याचे संकेत आहेत.

बेवॉचमधील दृश्‍यांना नो कट देताना ते म्हणाले, "बिकिनीच्या दृश्‍यांना आता कट द्यायचे दिवस गेले. अलिकडे सर्रास ती घातली जाते. तुम्ही गोवा किंवा मालदीवला गेलात तर तुम्हाला ती पाहता येते. त्यामुळे अशी काही दृश्‍ये सिनेमात दिसली तर त्यात वावगे वाटू नये. भारतीय सिनेमा जगताने या मुद्याला फार महत्त्व देऊ नये.' 

Web Title: green signal for priyanka bikini