
Mahabharat fame shakuni mama aka Gufi Paintal Health Updates : टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून घर केले त्यात रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांचे स्थान मोठे आहे. आजही या मालिका मोठ्या आवडीनं आणि श्रद्धेनं पाहिल्या जातात. त्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील वेगळी ओळख त्यानिमित्तानं मिळाल्याचे दिसून आले आहे.
महाभारत मालिकेमध्ये शकुनी मामाची भूमिका करणारे प्रसिद्ध कलाकार गुफी पेंटल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृती विषयीची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी गुफी यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!
अभिनेत्री टीना घई यांनी अभिनेते गुफी यांच्या प्रकृतीविषयीची बातमी सोशल मीडियावर शेयर केली आहे. ती पोस्ट शेयर करताना टीना यांनी लिहिले आहे की, गुफी यांची प्रकृती नाजूक आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारीही आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी. टीना यांची ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स देखील दिल्या आहेत.
गुफी यांच्या कुटूंबियांकडून मात्र अजुनही कोणत्याताही प्रकारचे अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. टीना यांच्या पोस्टनुसार गुफी यांना ३१ मे रोजी त्यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुफी यांच्या करिअरविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी १९८० च्या दशकांत चित्रपट विश्वात पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांमधून काम केले. महाभारत मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली शकुनी मामाची भूमिका प्रेक्षकांना भावली होती.