Gullak Season 4 : 'गुल्लक' चा ४ था सीझन येतोय! अमन मिश्रानं दिली मोठी अपडेट!

प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या गुल्लक नावाच्या मालिकेचे आतापर्यत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
Gullak New Season 4 Announced
Gullak New Season 4 Announcedesakal

Gullak New Season 4 Announced : ओटीटी मनोरंजन विश्वात ज्या सीरिज आणि चित्रपटांनी प्रेक्षकांना जिंकून घेतले त्यात गुल्लकचे नाव पहिल्या पाचमध्ये घ्यावे लागेल. भारतीय वेबविश्वात सेक्रेड गेम्स, द फॅमिली मॅन, पंचायत, मिर्झापूर या मालिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यात गुल्लक या आगळ्या वेगळ्या विषयांवरील मालिकेनं चाहत्यांची पसंती मिळवली होती.

प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या गुल्लक नावाच्या मालिकेचे आतापर्यत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यानंतर आता या मालिकेचा ४ था सीझन देखील आता प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मालिकेतील अभिनेता हर्ष मायर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन याबाबत एक महत्वाची अपडेट दिली आहे. प्रेक्षकांनी, चाहत्यांनी ही पोस्ट पाहिल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे.

मायरनं त्याच्या त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चार जण पुन्हा एकत्र , याचा अर्थ हा एकच असू शकतो तो म्हणजे....अशा शब्दांतील त्या पोस्टने नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. एका मध्यमवर्गीय कुटूंबातील त्या मालिकेनं वेगवेगळ्या विषयांवर मार्मिकपणे भाष्य करत प्रेक्षकांना अंतर्मुख केले होते. निखळपणे हसवत जीवनावश्यक गोष्टींविषयी महत्वाचे भाष्य गुल्लकच्या माध्यमातून समोर आले होते.

गुल्लकच्या तीनही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता या मालिकेचा ४ सीझनही येणार आहे. आयुष्य हे वेगवेगळ्या रंजक गोष्टींनी भरलेलं आहे. आपण त्याकडे कसे पाहतो आणि त्या गोष्टींपासून नव्यानं काय शिकतो याची शिकवण गुल्लकच्या माध्यमातून पाहायला मिळते. अशावेळी या मालिकेच्या नव्या सीझनची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत आहेत.

अभिनेता हर्ष मायरच्या त्या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आम्ही बऱ्याच दिवसांपासून या मालिकेच्या ४ थ्या सीझनची वाट पाहत आहोत. आता तुम्ही दिलेल्या बातमीनं खूपच आनंद झाला आहे. अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी दिल्या आहेत. मात्र हा ४ था सीझन केव्हा प्रदर्शित होणार याबाबत नेटकऱ्यांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com