
Mrunal Thakur: मृणाल होतेय डिप्रेशनची बळी? सांगितली रडणाऱ्या फोटोमागची कहाणी..
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरवात केली आणि आता तिने मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या प्रतिभेच्या आणि अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवला आहे.
सध्या ती तिच्या गुमराह या चित्रपटामुळे चर्चेत असली तरी काही दिवसांपुर्वी मृणालने तिचा एक रडतांनाचा फोटो शेअर केला आणि त्यानंतर अनेक चर्चांना सुरुवात झाली. तिच्या चाहत्यांनाही तिची काळजी वाटू लागली.
मृणालला नेमकं काय झालयं असा प्रश्न तिचे चाहते विचारत होते. तिने शेअर केलेल्या केलेल्या फोटोमध्ये मृणालचे डोळे सुजलेले दिसले, ज्याला पाहून असे वाटत होते की ती खूप रडली आहे.

Mrunal Thakur
इंस्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर करताना मृणालने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कालचा दिवस कठीण होता, पण आज मी अधिक मजबूत, समजदार आणि आनंदी आहे, प्रत्येकाच्या कथांची अनेक पाने आहेत, परंतु प्रत्येकजण त्या मोठ्याने वाचत नाही, मला माझ्या कथांची पाने मोठ्याने वाचायची आहेत, कारण कदाचित मी त्याद्वारे जे शिकले ते कोणीतरी शिकले पाहिजे.'
हे फोटो पाहिल्यानंतर ती डिप्रेशनची शिकार झाली आहे किंवा तिचे ब्रेकअप झाले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, मृणालने स्वत: तिच्या त्या फोटोबद्दल सांगितले आहे.
ती पोस्ट शेअर केल्यानंतर तिला खूप आराम वाटत असल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे. मृणाल म्हणाली की एखाद्या व्यक्तीने 'असुरक्षित होण्याची भीती' बाळगू नका. कमीपणा वाटणे आणि मदत मागणे यात एक बारिक रेषा आहे'.
मृणाल ठाकूरने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'कधीकधी तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतात, तुम्हाला कोणाकडून तरी प्रोत्साहन मिळावं आणि ती पोस्ट शेअर केल्यानंतर मला खूप बरं वाटलं.'
पुढे ती म्हणते, 'अनेक लोकांनी स्वतःमधली कमतरता दाखवणं बंद केलंय. असे दिवस असतात जेव्हा आपण दुःखी होतो, आपल्याला आत्मविश्वास कमी वाटतो परंतु याचा अर्थ असा नाही की नैराश्य सारखा मोठा शब्द वापरावा लागेल. कमीपणा वाटणं आणि मदत मागणे यात एक बारिक रेषा आहे, फक्त ते स्वीकारा.'