Guns and Gulaabs:'अपनी पिस्तौल तैयार रखें क्योंकि...', राजकुमारच्या 'गन्स अँड गुलाब्स'चा ट्रेलर रिलिज!

'Guns & Gulaabs' Rajkummar Rao, Dulquer Salmaan and Adarsh Gourav  Trailer Released
'Guns & Gulaabs' Rajkummar Rao, Dulquer Salmaan and Adarsh Gourav Trailer Released Esakal

बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर त्यात राजकुमार रावचं नाव नक्कीच सामील होईल. आपल्या दमदार अभिनयामुळे राजकुमार रावने इंडस्ट्रीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. राजकुमार रावच्या "गन्स अँड गुलाब्स" या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला होता.

'Guns & Gulaabs' Rajkummar Rao, Dulquer Salmaan and Adarsh Gourav  Trailer Released
Ranveer Singh Grandfather: शेवटी ते रणवीरचेच आजोबा, झुमका गिरा रे वाजलं, बाबा थिरकले!

आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज केला आहे. या बहुप्रतिक्षित सीरिज चा ट्रेलर लाँच आज झाला असून एक उत्तम कॉमेडी बघायला मिळत आहे.

राज आणि डीके दिग्दर्शित या आगामी कॉमेडी थ्रिलर साठी चाहते उत्सुक आहेत. दुलकर सलमान, आदर्श गौरव आणि गुलशन सोबत अविश्वसनीय प्रतिभावान राजकुमार राव यांच्या भूमिका यात अनुभवयाला मिळणार आहेत.

'Guns & Gulaabs' Rajkummar Rao, Dulquer Salmaan and Adarsh Gourav  Trailer Released
Nitin Desai Death: नितिन देसाईच्या जाण्यानं अक्षय कुमार धक्क्यात! घेतला मोठा निर्णय

90 च्या दशकात नेणारा हा एक अॅक्शन चित्रपट आहे. ज्यात राजकुमारने कॉमेडी डोस दिला आहे. या सगळ्यात एक विषय चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राजकुमार रावचा नवीन लूक. लांब केस, एक चकचकीत जाकीट, आणि एक विनोदी स्वभाव प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे.

राजकुमार राव हा नेहमी वेगवेगळ्या भुमिका साकारत असतो. त्यामुळे त्याला समीक्षकांची प्रशंसा आणि चाहत्यांची कौतुकाची थाप मिळवली आहे.

'Guns & Gulaabs' Rajkummar Rao, Dulquer Salmaan and Adarsh Gourav  Trailer Released
Nitin Desai Death: "मराठी माणूस आपलं आयुष्य असं संपवतो तेव्हा..", नितीन देसाईंवर हेमांगी कवीची भावूक पोस्ट

नेटफ्लिक्सने ट्विटरवर 'गन्स अँड गुलाब्स'चा ट्रेलर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'तुमची पिस्तूल तयार ठेवा कारण जास्त रोमान्स, कॉमेडी आणि अॅक्शन कुठेही मिळणार नाही.'

'गन्स अँड रोझेस' ही क्राईम-रोमँटिक-ड्रामा मालिका आहे. सुमन कुमार यांनी कथा लिहिली आहे. 'गन्स अँड गुलाब्स'ची कथा 90 च्या दशकातील गुन्हेगारीवर आधारित असेल. ही सिरिड 18 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com