"प्रत्येक अभिनेता आधी माणूस असला पाहिजे..."; गुरमीतने रस्त्यावर कोसळलेल्या माणसाला दिला CPR! सर्वत्र होतय कौतुक 

Gurmeet Chaudhary
Gurmeet Chaudhary

Gurmeet Chaudhary: अंधेरीच्या रस्त्यावर एक व्यक्ती अचानक कोसळली. यामुळे आजूबाजूला असलेले लोक जमा झाले. दरम्यान या व्यक्तीला अभिनेता गुरमीत चौधरीने CPR (Cardiopulmonary resuscitation) दिला.

यामुळे लोक गुरमीत चौधरीचे कौतुक करत आहेत. सेलिब्रिटी असूनही त्यानी आपत्कालीन परिस्थिती समजून घेतली. रुग्णवाहिका बोलवण्याच्या किंवा डॉक्टरची वाट पाहण्याऐवजी गुरमीत चौधरीने त्या व्यक्तीला तातडीने सीपीआर देण्यास सुरुवात केली.

या घटनेमुळे मूलभूत प्रथमोपचार किंवा सीपीआर जाणून घेणे किती महत्त्वाचे आहे ही गोष्ट समोर आली आहे. योग्य CPR पद्धती जाणून घेल्यामुळे आपण एखाद्याचा जीव देखील वाचवू शकतो. गुरमीत चौधरीने केलेल्या मदतीवरुन हे सिद्ध होते.

गुरमीत चौधरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक चाहते गुरमीतचे कौतुक करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले - 'खूप गुड गुरमीत भाई', तर दुसऱ्या यूजरने कमेंट करताना म्हटले - 'प्रत्येक अभिनेता आधी माणूस असला पाहिजे आणि नंतर अभिनेता'.

हृदयविकाराचा झटका आल्यास वेळेत सीपीआर दिला गेला तर, पिडीत व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. सीपीआरमध्ये, पिडीत व्यक्तीला पंपिंग करताना त्याच्या छातीच्या मध्यभागी तळहात ठेवून दाबले जाते. असे केल्याने हृदयाचे ठोके पुन्हा सुरू होतात.

Gurmeet Chaudhary
Bobby Darling : दिल्लीच्या मेट्रोत 'बॉबी'चा राडा, प्रवाशाला मारहाण करुन केली शिवीगाळ! Video Viral

गुरमीत चौधरी एक अभिनेता आणि मार्शल आर्टिस्ट आहे. रामायण मधील राम, गीत - हुई सबसे परायी मधील मानसिंग खुराना आणि पुपुनर्विवाह, जिंदगी मिलेगी दोबारा मधील यश सूरज प्रताप सिंधीना यांच्या भूमिकेसाठी तो ओळखल्या जातो. (Latest Marathi News)

२०१२ मध्ये गुरमीतने झलक दिखला जा ५ मध्ये भाग घेतला आणि तो विजेता म्हणून समोर आला होता. त्याने नच बलिए ६ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ५ मध्ये देखील भाग घेतला आणि दोन्हीमध्ये तो प्रथम उपविजेता ठरला होता. फॉक्स स्टुडिओच्या सायकॉलॉजिकल थ्रिलर आणि हॉरर चित्रपट खामोशियांमधून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 

Gurmeet Chaudhary
Leo Trailer : नाद करा पण 'थलापती'चा कुठं? केजीएफचा रॉकी, जवानच्या विक्रम राठोडनं 'लिओ'चा ट्रेलर पाहून जोडले असते हात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com