Guru Purnima 2023: गुरुंच्या मार्गदर्शनासाठी अभिनेत्रीनं सोडलं पुणे अन् थेट गाठलं केरळ!

Guru Purnima 2023
Guru Purnima 2023Esakal

-सुचिता गायकवाड

गुरुपौर्णिमा हा कृतज्ञतेचा दिवस आहे. या दिवशी गुरूंनी दिलेल्या ज्ञानाबद्दल त्यांचे आभार मानले जातात. महाराष्ट्राला गुरू-शिष्याची मोठी परंपरा लाभली आहे.

एखाद्या विषयासंबंधीचे शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी चांगल्या गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत आवश्‍यक असते. अशा एका शिष्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. जिने कला जोपासण्यासाठी पुण्याहून थेट केरळ गाठले. श्वेता परदेशी असे या तरुणीचे नाव.

Guru Purnima 2023
Ketaki Chitale Post On Guru Purnima: कोण आहे केतकी चितळेचा गुरु? पोस्ट व्हायरल..

मुळची पुण्याची असलेली श्वेता ही एक कलाकार, अभिनेत्री व नृत्य शिक्षिका आहे. केरळला कलारीपयट्टू या युद्ध कलेचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती पुण्याहून थेट केरळ गाठले. श्वेता मागील काही वर्षे कलारीपयट्टूचे ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण घेत होती.

मात्र, पूर्वीपासून चालत आलेल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीची आवड असल्यामुळे तिने केरळमधील पल्लकड या गावात राहून या कलेचे प्रशिक्षण घेतले. बैजू मोहन दास हे तिचे गुरू होते. त्यांच्याकडून गुरुकुल पद्धतीने तिने प्रशिक्षण घेतले.

पुण्यात ती स्वतः योगा, नृत्यांची शिक्षिका आहे. मात्र, कलेच्या जिज्ञासेमुळे तिने स्वतः शिष्य बनून एक नवी कला जोपासली, कलारीपयट्टू ही एक युद्ध कला आहे.

Guru Purnima 2023
Akshay Kumar OMG 2: अक्षयचं फ्लॉप करिअर महादेव वाचवणार? 'OMG 2' चं पोस्टर रिलिज..टिझरही लवकरच..

कलारीपयट्टू युद्ध कला

कलारीपयट्टू ही भारतातील युद्ध कलांपैकी एक आहे. जी केरळच्या दक्षिणेकडील राज्यातून रुजलेली आहे. सर्वात जुन्या असलेल्या युद्ध कलांपैकी एक. कलारीपयट्टूला इंग्रजीमध्ये सर्व मार्शल आर्ट्सची जननी म्हणून ओळखले जाते. हे केरळ आणि तमिळनाडू आणि कर्नाटकच्या लगतच्या भागांमध्ये प्रचलित आहे.

श्वेताने याचाच अभ्यास करून या युद्ध कलेचा उगम झालेल्या भूमीवरच जाऊन ही कला जोपासली आहे. या कलेचे पुण्यातही प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.कलारीपयट्टू ही भारतातील युद्ध कलांपैकी एक आहे. जी केरळच्या दक्षिणेकडील राज्यातून रुजलेली आहे.

सर्वात जुन्या असलेल्या युद्ध कलांपैकी एक. कलारीपयट्टूला इंग्रजीमध्ये सर्व मार्शल आर्ट्सची जननी म्हणून ओळखले जाते. हे केरळ आणि तमिळनाडू आणि कर्नाटकच्या लगतच्या भागांमध्ये प्रचलित आहे.

श्वेताने याचाच अभ्यास करून या युद्ध कलेचा उगम झालेल्या भूमीवरच जाऊन ही कला जोपासली आहे. या कलेचे पुण्यातही प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.

Guru Purnima 2023
Gadar 2: तारा- सकीनाच्या लव्हस्टोरीत नाना पाटेकरांची एन्ट्री! कोणत्या भुमिकेत करणार 'गदर'?

याविषयी बोलतांना श्वेता परदेशी म्हणते की, "नेहमी नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असल्याने मी काही ना काहीतरी शिकत असते. युद्ध कला ही त्या मातीत जाऊन केल्याशिवाय उमगली नसती. खूप छान आणि वेगळा अनुभव होता. मार्शल आर्ट्स मुलींनी शिकायला हवे. स्वरक्षणासाठी सध्या आपणचा खंबीर असणे गरजेचे आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com