
मुंबई- बॉलीवूडमध्ये कोरोना काळात लोकांसाठी देवदूत बनत समोर आलेला अभिनेता सोनु सूद सोशल मिडियावर खूप ऍक्टीव्ह असतो. सोनु जसा लोकांच्या मदतीसाठी पुढे येत असतो तसंच लोकदेखील त्याची स्तुती करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबताना दिसून येतायेत. सोशल मिडियावर सोनुचे आभार व्यक्त करण्यासाठी लोक या ना त्या प्रकारे त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन देत असतात. असाच एक व्हिडिओ सोनूने त्याच्या सोशल साईटवरुन शेअर केला आहे जो पाहुन सोनु स्वतः खूप भावूक झाला आहे. हा व्हिडिओ एका दिव्यांग मुलाचा आहे.
सोनु सूदने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक ९ वर्षाचा लहान दिव्यांग मुलगा तोंडामध्ये ब्रश पकडून सोनूचं चित्र बनवत आहे. हा व्हिडिओ पाहून सोनु भावुक झाला आणि त्याने त्याच्या भावना हा व्हिडिओ शेअर करत व्यक्त केल्या. हा व्हिडिओ शेअर करताना सोनुने लिहिलंय, 'मनाला भावलं. गोड मुला लवकरच तुझ्यासोबत भेट होईल. ' सोनु सूदचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूप पसंत पडत आहे. यासोबतंच सोनुची ही पोस्ट देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
कमेंट्समध्ये जिथे एकीकडे लोक त्या लहान मुलाच्या कलेची स्तुती करत आहेत तिथेच दुसरीकडे सोनुचं देखील कौतुक होताना दिसतंय. या लहान मुलाने एका घटनेत त्याचे हात आणि पाय गमावले. या नऊ वर्षीय मुलाचं नाव मधु कुमार असल्याचं म्हटलं जातंय. मधु तेलंगणा येथील मेडक जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याची कहाणी लोकांच्या मनाला भावत आहे. हात आणि पाय गमावल्यानंतरही तो तोंडामध्ये ब्रश पकडून त्याचं सुंदर चित्र बनवत आहे.
handicap child made a sketch of sonu sood by holding a paint brush with his mouth
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.