अनुपम खेर यांची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी; नाटकानं आणलं जवळ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

मुंबई या शहरात बरेचशे लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. चित्रपटसृष्टीत तर रोज नवे कलाकार येत असतात, त्यातीलच काही हिट ठरतात तर काही अपयशी ठरतात. सध्या तर वाढत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कलाकार पहिल्याच प्रयत्नात प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरतात आणि त्यानंतर त्यांचं नशीब बदलून जात. असाच एका कलाकार चित्रपटसृष्टीत आला आणि त्याने यशाची शिखर गाठली. अनुपम खेर असे या कलाकाराचे नाव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई या शहरात बरेचशे लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. चित्रपटसृष्टीत तर रोज नवे कलाकार येत असतात, त्यातीलच काही हिट ठरतात तर काही अपयशी ठरतात. सध्या तर वाढत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कलाकार पहिल्याच प्रयत्नात प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरतात आणि त्यानंतर त्यांचं नशीब बदलून जात. असाच एका कलाकार चित्रपटसृष्टीत आला आणि त्याने यशाची शिखर गाठली. अनुपम खेर असे या कलाकाराचे नाव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पत्नीशी अनोखी केमिस्ट्री
आज अनुपम खेर 60वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनुपम यांनी चित्रपटसृष्टीत एन्ट्री करताच त्यांना "सारांश' या चित्रपटात पहिलीच भूमिका 65 वर्षांच्या व्यक्तीची मिळाली. त्यांनी ती केलीही. जेव्हा त्यांनी ही भूमिका साकारली तेव्हा ते केवळ 28 वर्षांचे होते. आतापर्यंत त्यांनी जवळपास 500 चित्रपटात काम केले आहे. फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये त्यांनी आपलं नशीब आजमावलं आहे. बॉलिवूडमधले ते एक यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत त्यांनी बॉलिवूड गाजवलं आहे. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांची पर्सनल लाईफही तितकीच गाजली. त्यांची पत्नी किरण खेर आणि अनुपम खेर या जोडी प्रेमाचे एक मोठं उदाहरण आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडते. 

बागी ३ : अॅक्शनला लिखाणाचं गालबोट

फिल्मी लव्हस्टोरी
या दोघांची लव्हस्टोरी एक फिल्मी कथेपेक्षा कमी नाही आहे. किरण खेर यांची दोन लग्न झाली आहेत हे तर जगजाहीर आहे. परंतु, चाहत्यांना कदाचित हे ठाऊक नसावं की, अनुपम यांचीही दोन लग्न झाली आहेत. अनुपम जेव्हा चित्रपटसृष्टीत आले त्यावेळी त्यांनी घरच्यांनी ठरवून दिलेल्या मुलीशी लग्न केलं. त्यांचं नाव मधुमालती होतं. पण, काही काळातच त्यांच्या खासगी आयुष्यात तणाव निर्माण होऊ लागला.

'बेबो' करिनाची इन्स्टाग्रामवर धडाक्यात एन्ट्री

त्याचवेळी एका नाटकासाठी काम करत असताना त्यांची ओळख किरण यांच्याशी झाली. किरण यांच्या रूपात त्यांना एक चांगली मैत्रीण मिळाली होती. अभिनय क्षेत्रात काम करत असताना त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली. त्यांच्या याच मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर होतं आहे याची कल्पना या दोघांनाही कल्पनाच नव्हती. एका मुलाखतीत बोलताना किरण यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला होता. 

नाटकानं जुळवलं
किरण या बिझनेसमॅन गौतम बेरी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्या होत्या. गौतम-किरणच्या मुलाचे नाव सिंकदर खेर असे आहे. मात्र काही काळानंतर त्यांच्या नात्यामध्येही तणाव निर्माण होत गेला आणि ते नातं टिकणार नाही याची त्यांना जाणीव झाली. अनुपण-किरण या दोघांच्याही आयुष्यात तणाव असतानाही दोघे नाटकामध्ये काम करत होते. अशावेळी किरण-अनुपम नादिर बब्बर यांच्या एका नाटकाच्या प्रयोगासाठी कोलकाता येथे गेल. त्या वेळी नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर अनुपम यांनी किरणकडे पाहिलं आणि त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळी भावना आहे याची किरण यांना जाणीव झाली. तोच क्षण त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी पुरेसा होता. त्या वेळी अनुमपम यांनी किरण यांच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या प्रेमाची कबूली दिली होती. त्यानंतर दोघांनीही त्यांच्या आधीच्या नात्याला तिथेचं थांबवण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या पार्टनरसोबत घटस्फोट घेतला. आणि 1985मध्ये हे दोघेही विवाहबंधनात अडकले. अशी ही अनुपम यांच्या प्रेमाची फिल्मी कहानी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday anupam kher kirron kher love story bollywood news