rajnikanth
rajnikanth

कधीकाळी कुलीचं काम करत होते रजनीकांत, 'या' मित्रामुळे बनले सुपरस्टार

साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये बंगळुरु येथे झाला. त्यांच्या प्रेमात लोक वेडे होतात. त्यांना देव मानतात. रजनीकांत यांचे सिनेमे पहाटे साडेतीनपर्यंत रिलीज होत असतात.  कुली ते सुपरस्टार बनणारे रजनीकांत कधीच इथपर्यंत पोहोचले नसते जर त्यांचा मित्र राज बहादुर यांनी रजनीकांत यांचं अभिनेता बनण्याचं स्वप्न जिवंत ठेवलं नसतं. वडील रामोजी राव यांच्या चार मुलांपैकी शिवाजी गायकवाड सगळ्यात लहान होते. जेव्हा ते पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांची आई जीजाबाई यांचं निधन झालं. घरातील परिस्थिती खराब होत होती त्यामुळे रजनीकांत यांना कुलीचं काम करावं लागलं होतं. जेव्हा ते मोठे झाले तेव्हा त्यांना बसमध्ये कंडक्टरची नोकरी मिळाली.

रजनीकांत यांना अभिनेता बनण्याची इच्छा होती. त्यांच हेच स्वप्न त्यांचा मित्र बहादूरने जिवंत ठेवलं आणि त्यांनीच रजनीकांत यांना मद्रास सिने इंस्टिट्युटमध्ये दाखल होण्यास सांगितलं. मित्राच्या मदतीमुळे रजनीकांत पुढे जात राहिले आणि सिनेमात काम करायला लागले.रजनीकांत यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९७५ मध्ये रिलीज झालेल्या अपूर्वा 'रागनलाल'पासून केली. या सिनेमा त्यांच्या व्यतिरिक्त कमल हासन, श्रीविद्यासारख्या मोठ्या स्टार्सनी काम केलं होतं.

रजनीकांत यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात सुरुवातीला निगेटीव्ह भूमिकांमधून केली. रजनीकांच यांनी पहिल्यांदा 'भुवन ओरु केल्विकुरी'मध्ये हिरोची भूमिका साकारली होती. त्यांचा बिल्ला हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरला आणि तेव्हापासूनंच रजनीकांत सगळ्यांच्या नजरेत आले. १९८३ साली त्यांनी बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली. त्यांचा पहिला सिनेमा 'अंधा कानून' होता. त्यानंतर त्यांनी फक्त यशाच्या पाय-या चढल्या. आज ते दक्षिण भारतीय सिनेमातील सगळ्यात मोठे सुपरस्टार मानले जातात.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com