Rashami Desai Birthday: रश्मी देसाईची लव्ह लाईफ कायमच चर्चेत..चार वर्षातच मोडला संसार तर कधी...

रश्मी कामापेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे अधिक चर्चेत आली.
Rashami Desai Birthday celebrations
Rashami Desai Birthday celebrationsSakal

Rashami Desai Birthday: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईचा आज 13 फेब्रुवारी रोजी 37 वा वाढदिवस आहे. रश्मी कामापेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे अधिक चर्चेत आली. 1986 मध्ये आजच्या दिवशी नागाव येथे तिचा जन्म झाला.

ती आसामची आहे आणि तिने लहान वयातच अभिनय क्षेत्रात करिअरला सुरुवात केली होती. अभिनेत्रीने वयाच्या 16-17 व्या वर्षी अभिनयाच्या जगात प्रवेश केला.

रश्मी देसाईने 2006 मध्ये 'रावण' या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. पण त्याआधी तिने भोजपुरी आणि आसामी चित्रपटात अभिनयाचा पराक्रम दाखवला होता. तिने भोजपुरीमध्ये मनोज तिवारीसारख्या स्टार्ससोबत रोमान्स केला आहे.

चित्रपटांसोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिने एक नाही तर 3-3 जणांशी संबंध ठेवले आहेत. पण आजही तिने लग्न केलेले नाही.

Rashami Desai Birthday celebrations
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमानचा पूजासोबत रोमँटिक अंदाज... 'नय्यो लगदा' गाणं रिलीज

'उतरन' या टीव्ही मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रश्मी देसाई हिने 2012 मध्ये नंदिश संधूसोबत लग्न केले. दोघे 'उत्रान'च्या सेटवर भेटले आणि सेटवर काम करत असताना जवळ आले. यानंतर 2012 मध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.

नंदिश आणि रश्मीचे नाते चार वर्षांतच तुटले. रिपोर्ट्सनुसार, यानंतर अभिनेत्रीचे नाव लक्ष्य लालवानीसोबत जोडले गेले. लक्ष्य रश्मीपेक्षा 10 वर्षांनी लहान असल्याचं सांगण्यात येत आहे. अभिनेत्रीची आई या नात्यावर खूश नव्हती, ज्यामुळे ते वेगळे झाले.

यानंतर रश्मी टीव्ही सीरियल 'दिल से दिल तक'मध्ये सिद्धार्थ शुक्लासोबत दिसली. इथून एका नव्या प्रेमकथेची चर्चा सुरू झाली. याच्या सेटवर दोघांमधील जवळीक खूप वाढली होती. पण, त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही.

त्यानंतर रश्मी देसाईचे नाव अरहान खानसोबत जोडले गेले. अरहान आणि रश्मी देसाई यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघे बिग बॉस 13 मध्ये दिसले आहेत. येथे अरहानच्या लग्नाचा खुलासा झाला, जे त्यांचे नाते तुटण्याचे कारण बनले. त्यांचा वाद खूप चर्चेत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com