'हॅपी फिर भाग जाएगी'चा ट्रेलर रिलीज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

2016 मध्ये 'हॅपी भाग जाएगी' सिनेमा हिट झाला होता. या सिनेमात जिमी शेरगिल, डायना पेंटी, अली फजल, अभय देओल आणि पियुष मिश्रा यांच्या प्रमुख भुमिका होत्या. सिक्वेलमध्येही या सगळ्यांच्या भुमिका आहे. 

मुंबई : 'हॅपी भाग जाएगी' चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हॅपी फिर भाग जाएगी' या सिनेमात जिमी शेरगिल, सोनाक्षी सिन्हा यांची मुख्य भुमिका आहे. 

2016 मध्ये 'हॅपी भाग जाएगी' सिनेमा हिट झाला होता. या सिनेमात जिमी शेरगिल, डायना पेंटी, अली फजल, अभय देओल आणि पियुष मिश्रा यांच्या प्रमुख भुमिका होत्या. सिक्वेलमध्येही या सगळ्यांच्या भुमिका आहे. 

'हॅपी फिर भाग जाएगी' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनाक्षी चिनी गुंडांच्या तावडीत सापडते आणि एकाच नावाच्या गोंधळामुळे कशी गडबड होते हे सिनेमात दाखविले आहे. जिमी शेरगिलचे लग्नं मोडल्याने तो त्याच्या लग्नातून पळून गेलेल्या नवरीच्या शोधात परदेशात येतो. अली आणि डायना यांची झलक ट्रेलरच्या शेवटी बघायला मिळते.   
 
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happy Phir Bhaag Jayegi Trailer Release