#HappyBirthdayAmruta : सोज्वळ अभिनेत्रीला चाहत्यांच्या शुभेच्छा

#HappyBirthdayAmruta : सोज्वळ अभिनेत्रीला चाहत्यांच्या शुभेच्छा
Updated on

मुंबई ः कोंकणी परिवारात जन्मलेल्या अमृता रावचा आज वाढदिवस आहे. अमृताचे शिक्षण मुंबईत झाले. अमृता रावने आपल्या करियरची सुरुवात मॉडलिंगने केली. काही जाहिरातीसाठी तिने काम केले.  २००२ मध्ये आलेला 'अब के बरस' हा अमृता रावचा पहिला चित्रपट.  मात्र  २००३ मध्ये आलेल्या ‘इश्क-विश्क’ चित्रपटाने अमृताला बॉलीवूडमध्ये चांगली ओळख मिळाली. त्यानंतर अमृताने हिंदी चित्रपटांबरोबरच तेलगू चित्रपटांमध्येही काम केले. सरळ-साधे आणि सोज्वळ असे रोल अमृताने केले. मात्र अंदर की बात अशी आहे की इंटिमेट सीन्स देण्यास अमृताने नकार दिल्यामुळे तिच्या करिअरवर खूप मोठा परिणाम झाला. तिला चित्रपटसृष्टीतून ब्रेक घ्यावा लागला.  

'इश्क विश्क', 'मस्ती', 'मैं हूं ना', 'प्यारे मोहन', 'जॉली एलएलबी', 'सत्याग्रह' या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. अमृता  रावने‘मेरी आवाज ही पहचान है’ या मालिकेमध्ये काम केले आहे. ठाकरे या चित्रपटात अमृताने मीनाताई ठाकरे यांची व्यक्तिरेखा निभावली. तेलगू चित्रपट अतिथीमध्ये तिने साऊथचा सुपर्साट महेश बाबूबरोबर काम केले. साऊथमधील ही तिची पहिली फिल्म होती. इश्क विश्कमध्ये तिची आणि शाहीद कपूरची जोडी प्रेक्षकांना कमालीची भावली. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आल्या. सन  २००७ मध्ये अमृता रावला यशराज फिल्सची ऑफर मिळाली. या चित्रपटात तिचा रणबीर कपूरसोबतचा किस सीन होता. मात्र अमृताने रणबीरला किस करण्यास नकार दिला. यानंतर चर्चा फिस्कटली आणि अमृताने हा चित्रपटच नाकारला.’लीजंड ऑफ भगत सिंह’ या चित्रपटात पण अमृता रावने अभिनय केला आहे. अमृता रावने मे २०१६ मध्ये रेडिओ जॉकी अनमोलबरोबर लग्न केले.  

अभिनेत्री प्रीतिका राव ही अमृता रावची बहीण आहे.  माॅडेलंग ते हिंदी व साऊथ चित्रपटसृष्टीचा प्रवास अमृताने केला आहे. सालस आणि सोज्वळ अशा भूमिका तिने केल्या आणि चांगले नाव तिने कमावले. हिंदी चित्रपटात इंटिमेट सीन्स करण्यास तिने नकार दिला. याबाबत ती आपल्या मतांवर ठाम राहिली. याकरिता तिने मोठमोठ्या चित्रपटांच्या आॅफर्स नाकारल्या आहेत. पण त्याची पर्वा तिने केली नाही. तिने आपले काही नियम बनविले आणि आपल्या नियमानुसार व अटींसुनार चित्रपट स्वीकारले. आपल्या मतांवर ठाम असणारी ही अभिनेत्री आता अमृता प्राॅडक्शन या नावाने पुढे वाटचाल करीत आहे. वाढदिवसानिमित्त तिला नक्कीच शुभेच्छा द्यायला हव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com