Har Har Mahadev: शिवमणी यांच्या दमदार तालवादनात झालं 'हर हर महादेव'चं म्युझिक लॉंच

येत्या 25 ऑक्टोबरला देशभरात होणार 'हर हर महादेव'चा गजर..
har har mahadev movie music launch with sivamani cast subodh bhave sharad kelkar amruta khanvilkar
har har mahadev movie music launch with sivamani cast subodh bhave sharad kelkar amruta khanvilkar sakal

marathi movie: 'झी स्टुडियोज'च्या आगामी 'हर हर महादेव' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास तेवढ्याच भव्य दिव्य पद्धतीने या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘हर हर महादेव’ सर्वार्थाने मराठीत भव्यतेचा एक नवा पायंडा पाडणारा चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे या लौकिकाला साजेसा असाच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळाही मोठ्या दिमाखदार पद्धतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तालवादक शिवमणी यांचं तालवाद्यांचं सादरीकरण. दिमडीवर ताल धरत रंगमंचावर अवतरलेल्या शिवमणी यांनी पुढचे काही मिनिटे ड्रम्स, तबला, ढोल आणि इतर वाद्यांच्या वादनाची अशी काही मैफल रंगवली की उपस्थित प्रत्येक प्रेक्षक त्या नादाने भारावून गेला. या चित्रपटाच्या निमित्ताने शिवमणी पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील गाण्यासाठी तालवादन करणार आहेत हे विशेष. (har har mahadev movie music launch with sivamani cast subodh bhave sharad kelkar amruta khanvilkar )

'हर हर महादेव' या चित्रपटाला हितेश मोडक यांचं संगीत असून यातील यातील ‘बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं’ हे गाणं गीतकार मंदार चोळकरने लिहिलं असून ते मनिष राजगिरेने गायलं आहे. तर शीर्षक गीत ‘हर हर महादेव’ हे मंगेश कांगणेने लिहिलं असून ते गाणं सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायलं आहे. हे गाणं तालवादक शिवमणी यांच्या तालवादनाने सजलं आहे. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गायनाच्या दुनियेतला आजच्या घडीचा लखलखता तारा सिद श्रीराम या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटात गाणं गात आहे. हर हर महादेवमधील ‘वाह रे वाह शिवा’ हे गाणं त्याने गायलं असून या गाण्याचे शब्द आहेत मंगेश कांगणे यांचे.

या तीनही गाण्यांविषयी बोलताना संगीतकार हितेश मोडक म्हणाले की,”अशा प्रकारच्या भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपटाला आधूनिक वाद्यांचा वापर करून संगीत देणं हे खरंच खूप आव्हानात्मक काम होतं. या चित्रपटाच्या संगीतावर मी तब्बल अडीच वर्षे मेहनत घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच आपल्यामध्ये जी उर्जा संचारते, जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर ज्याप्रमाणे रक्त सळसळतं तोच अनुभव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या आधूनिक संगीताचा वापर या चित्रपटासाठी केला आहे आणि हा मिलाफ सुंदरपणे जुळून आला आहे जो रसिकांना नक्कीच आवडेल.”

'हर हर महादेव' या चित्रपटाची कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करता धिरोदात्तपणे लढणा-या झुंजार योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांची. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे साकारत आहे तर हिंदी आणि मराठी चित्रपटांत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता शरद केळकर बाजीप्रभुंच्या करारी भूमिकेत दिसणार आहे. हर हर महादेव हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरला झी स्टुडियोजच्या माध्यमातून मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड अशा पाच भारतीय भाषांमधून भारतभर प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com