
राणा अंजली लग्नाआधी एकत्र, एकमेकांसाठी खास पोस्ट करत म्हणाले..
झी मराठी वरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि (akshaya deodhar) अभिनेता हार्दिक जोशी (hardeek joshi) यांनी खऱ्या जीवनातही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर साखरपुडा केला. त्यांनी साकारलेल्या राणा आणि अंजली या पात्रांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. मालिकेनं निरोप घेतल्यानंतरही दोघं चर्चेत होते. पण त्यांनी त्यांच्या प्रेमाबाबत गोपनियता बाळगली गेली होती. साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत दोघांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आता लग्नाआधी अक्षया आणि हार्दिकने एकमेकांसाठी एक खास पोस्ट केली आहे. ( Akshaya Deodhar share video for Hardeek Joshi after Engagement)
हेही वाचा: राखी सावंत प्रियकरासोबत पोलिस ठाण्यात.. पहिल्या नवऱ्याची केली तक्रार
राणा आणि अंजलीचे लग्न कधी होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण त्याला अजून काहीसा अवकाश आहे. सध्या अक्षया आणि हार्दिक एकमेकांसोबत कॉलिटी टाइम स्पेंड करत आहेत. दोघांनीही एकमेकांसोबत बीच वरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. चाहत्यांनीही या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे. (hardeek joshi and akshaya deodhar spends quality time and shared emotional post)
ते दोघेही बोईसर येथील नांदगाव समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. तिथलाच एक फोटो दोघांनीही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोत अक्षया आणि हार्दिक दोघांनीही मिकी माउसची प्रिंट असलेले टी शर्ट घातले आहेत. समुद्र किनाऱ्यावर एक पोज देत अक्षयाने लिहिलं आहे की, 'माझ्या पूर्णत्वासाठी तुझ्या प्रेमाची नितांत गरज आहे.' तर हाच फोटो हार्दिकने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
Web Title: Hardeek Joshi And Akshaya Deodhar Spends Quality Time And Shared Emotional Post
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..