सपनाचा धिंगाणा, हरियाणवी गाण्यावर वंटास डान्स ; 28 लाख हिट

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

सपनानं एका हरियाणवी गाण्यावर जो डान्स केला आहे. त्यानं सर्वांना जिंकून घेतले आहे.त्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला तेव्हा अल्पावधीतच हिट झाला.

मुंबई - कोणी काही का म्हणेना पण सोशल मीडीयावर सपनाची मोठी क्रेझ आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. विशेषत; उत्तर भारतात तिची हवा आहे. तरुणाई तिच्या गाण्यावर थिरकताना दिसते. एखाद्या कलाकाराला लाजवेल अशा पध्दतीनं तिचं स्टारडम आहे. ते पाहिल्यावर कोणी सेलिब्रेटी आहे असे वाटल्याशिवाय राहणार नाही. अशा सपनाच्या एका गाण्यानं कमाल केली आहे. सोशल मीडियावर त्याचा बोलबाला आहे.

उत्तरेकडील राज्यात मनोरंजनाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. चौकटी पलीकडे जाऊन मनोरंजनाचा आनंद घेण्याची मानसिकता तेथील प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. सपनानं एका हरियाणवी गाण्यावर जो डान्स केला आहे. त्यानं सर्वांना जिंकून घेतले आहे. तिनं ज्यावेळी त्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला तेव्हा अल्पावधीतच हिट झाला. त्या गाण्यामध्ये सपनानं पिंक कलरचा ड्रेस घातला आहे. तिचा डान्स सर्वांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. त्याचवेळी तिच्यासोबत इतरही थिरकत आहेत. तो डान्स पाहण्यासाठी हजारोच्या संख्येनं प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. पंजाबी आणि हरियाणवी चित्रपटांमध्ये धमाल करणारी सपनाचा हा डान्स व्हिडीओ मोठ्या संख्येनं पाहिला जात आहे.

सपनाच्या डान्स व्हिडिओला आतापर्यत 28 लाखांपेक्षा अधिक हिटस मिळाले आहेत. यावरुन तिचा डान्स किती भन्नाट असेल याची कल्पना येईल. सुरुवातीला हरियाणवी युट्युबवर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा डोप छोरा' हे हरियाणवी गाणंही प्रदर्शित झाले आहे. त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्या गाण्यालाही प्रेक्षकांनी आपली पसंती दर्शवली आहे.

हे ही वाचा: बापरे! एवढ्या कोटींमध्ये विकले गेलेसलमान खानच्या 'राधे' सिनेमाचे हक्क  

उत्तर भारतात एक सेलिब्रेटी म्हणून प्रसिध्द असणारी सपनानं आपल्या करियरची सुरुवात हरियाणातील एका ऑर्केस्ट्रामधून केली. त्यावेळी सहकलाकारांनी केलेल्या सहकार्यामुळे तिला मोठं यश मिळाल्याचे ती सांगते. तेव्हा सपना गावातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये गाणं म्हणत असे. शेजारच्या राज्यांमध्येही तिनं आपल्या गायकी आणि नृत्याची छलक दाखवली. आणि लोकांना वेड लावले. त्यानंतर सपनानं मागे वळून पाहिले नाही.विशेष म्हणजे सपना बिग बॉसची स्पर्धकही राहिली आहे. कदाचित बॉलीवूडमध्येही तिच्या वाट्याला एवढी प्रसिध्दी आली नसती तेवढी आता तिला मिळताना दिसत आहे. हे सारे श्रेय तिच्या पार्टीला आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hariyanvi singer sapna choudhary dance video viral bhojpuri punjabi song fever