बर्थडे स्पेशल: केवळ आवाजच नाही तर पगडीदेखील आहे 'या' गायिकेची ओळख

harshdeep kaur
harshdeep kaur
Updated on

मुंबई- बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौर आजच्या पिढीच्या आवडत्या गायिकांपैकी एक आहे. आपल्या गोड आवाजासोबतच ती तिच्या लुक आणि आऊटफिटसाठी देखील खासकरुन ओळखली जाते. आज 16 डिसेंबर हर्षदीपचा वाढदिवस आहे. या निमित्तानं तिच्या अचिव्हमेंट आणि काही प्रसिद्ध गाण्यांबद्दल..

हर्षदीप कौरचा जन्म 16 डिसेंबर 1986 रोजी दिल्लीत झाला होता. म्युझिकल बॅकग्राऊंड असल्याने वयाच्या 6 व्या वर्षापासून तिची संगीताची तालीम सुरू झाली. स्टार प्लसवरील रिॲलिटी सिंगिंग शो 'द वॉईस'मध्ये ती कोच म्हणून दिसली होती. 2008 साली तिनं 'जुनून कुछ कर दिखाने का' हा सिंगिंग कम्पीटीशन शो जिंकला होता. यात ती तिचे गुरू मास्टर राहत फतेह अली खानसोबत 'सूफी की सुल्तान' जॉनरसाठी कंपीट करत होती. हा किताब जिंकल्यानंतर तिला 'सूफी की सुल्ताना'चा किताब देण्यात आला. बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी तिला हा पुरस्कार दिला होता. ते शोच्या ग्रँड फिनालेचे मुख्य पाहुणे होते.

सूफी गाण्याचं सादरीकरण करताना हर्षदीपनं एक स्पेशल सूफी अटायर घातला होता. यात तिच्या पगडीचाही समावेश होता. तेव्हापासून आतापर्यंत तिची ही पगडी तिच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग बनली आहे. 'रंग दे बसंती' पासून तर 'राजी' पर्यंत हर्षदीपनं गायलेली अनेक हिट गाणी आहेत.

हर्षदीपच्या कामाच्याबाबतील बोलायचं झालं तर 2003 साली तिनं पहिलं बॉलिवूड गाणं गायलं होतं. 'रंग दे बसंती'मधील एक ओंकार, 'टॅक्सी नंबर 9211' मधील 'उडने दो', 'बँड बाजा बारात'मधील 'वारी बरसी', 'देसी बॉईज'मधील 'झक मार के', 'रॉकस्टार'मधील 'कतिया करू', 'कॉकटेल'मधील 'जुगनी', 'जब तक है जान' मधील 'हीर', 'राजी' सिनेमातील 'दिलबरो', 'मननर्जियां' सिनेमातील 'नोंच लडाईयां', 'पंगा'मधील 'ले पंगा' अशी अनेक गाणी तिने हिट दिली आहेत.  

harshdeep kaur birthday turban is the identity of sufi ki sultana  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com