'या पुरस्कारासाठी मी लायक नाही..' गौरव मोरेची पोस्ट चर्चेत..

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या कार्यक्रमातील अभिनेता गौरव मोरेला एका प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
gaurav more post after receiving  bhimratna purskar
gaurav more post after receiving bhimratna purskar sakal

Gaurav more : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'गौरव मोरे'. स्किट दरम्यान गौरव मोरेचा अपमान झाला नाही असा आजतागायत एकही भाग झालेला नाही. स्वतःवर विनोद करत प्रेक्षकांना हसवण्याचे बहुमोलाचे काम तो करत आहे. त्याचे काही गाजलेले स्किट आजही समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. कार्यक्रमात जरी स्किट चा भाग म्हणून गौरव चा अपमान होत असला तरी प्रत्यक्षात मात्र गौरवच्या या कार्याचा मोठा 'गौरव' करण्यात आला आहे. (hasyajatra fame gaurav more's post after receiving bhimratna purskar)

gaurav more post after receiving  bhimratna purskar
PHOTO: 'हा' चित्रपट आला आणि करणने 'K' चा नाद सोडला, काय आहे 'K' प्रकरण..

गौरवला (Gaurav More) नुकतंच एका पुरस्काराने गौरविण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारतानाच फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गौरवला धर्मात्मा फाउंडेशनने ‘भिमरत्न पुरस्कार’ (Bhimratna Award) देऊन सन्मानित केले. या पुरस्कारानंतर गौरव ने अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. गौरव म्हणतो, 'भिमरत्न पुरस्कार सोहळा २०२२... खरच मी हया पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देणारयांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे.आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोट्ठा मान आपण दिलात. खुप आभारी आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याहस्ते हा पुरस्कार देन्यात आला. सोबत महाराष्टाचे ख्यातनाम गायक आनंद शिंदेसाहेब,मिलिंद शिंदेसाहेब आणि मधुर शिंदे उपस्थित होते. धर्मात्मा फाउंडेशन चे खुप खुप आभार मानतो. सर्व प्रेकक्षकांचे आभार मानतो.'

गौरवने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केलं. यामध्येही त्याने विनोदी भूमिका साकारली होती. पण महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तो प्रकाशझोतात आला. ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणून त्याचिं ख्याती रसिकांमध्ये पसरली आहे. मराठी मालिका आणि चित्रपटांसोबतच त्याने हिंदीतही काम केलंय. संजू, झोया फॅक्टर यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com