हट के प्रमोशन 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत व बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षय कुमार यांचा आगामी चित्रपट "2.0'च्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यात आता या चित्रपटाचं जगभरात हट के प्रमोशन केलं जाणार आहे.

आता तुम्हाला प्रश्‍न पडला असेल, की म्हणजे नेमकं काय करणार? जगभरात "2.0'च्या प्रमोशनसाठी रजनीकांत व अक्षय कुमार यांचा मोठा फोटो असलेल्या हॉट एअर बलूनचा वापर केला जाणार आहे. 

लाइका प्रॉडक्‍शन्सचे क्रिएटिव्ह प्रमुख राजू महालिंगम यांनी सांगितलं, की "जगभरात होणाऱ्या बलून फेस्टिव्हलमध्ये शंभर फूट लांब हॉट एअर बलून घेऊन जाण्याची आम्ही योजना करीत आहोत. हा चित्रपट आम्ही हॉलीवूड स्तरावर बनवला आहे आणि आम्ही लॉस अँजेलिसमधील हॉलीवूड साइन बोर्डाच्या जवळ बलून बांधणार आहोत.' 

'2.0' च्या प्रमोशनसाठी बनवण्यात आलेला हा हॉट एअर बलून देशातील विविध शहरांमध्ये आणि लंडन, दुबई व ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांत पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Hatke Promotion 2.0 movie