
कोण भंग करतय देशाची शांती? 'अनेक'च्या ट्रेलरमधून आयुषमानचा मोठा खुलासा
भारताला स्वतंत्र होऊन आज ७५ वर्ष झाली आहेत. पण काही गोष्टी आजही मनाला बोचतात जेव्हा देश स्वतंत्र होण्याआधी स्वतःला 'सो कॉल्ड' बुद्धिमान म्हणवणाऱ्या लोकांनी भारत काही दिवसांतच तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागला जाईल असं म्हटलं होतं. याचं कारण भारतात विविध भाषा बोलणारी विविध धर्मांची लोकं राहतात. भारत तेव्हा आर्थिक आणि सामाजिक बाबतीत फारसा सशक्त नव्हता त्यामुळे सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्यात तो किती यशस्वी ठरेल याबाबतीत साशंकता होती. त्यामुळेच लोकांना वाटत होतं की भारत काही वर्षातच अनेक देशांत विभागला जाईल. पण भारतीयांचा एकता आणि अखंडतेवर असलेल्या विश्वासानं तसं काहीच घडलं नाही. यातच आता एक सिनेमा येत आहे जो देशाच्या एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे. नेहमीच प्रवाहाविरोधातले सिनेमे करणारा अभिनेता आयुषमान खुराना(Ayushmann Khurrana) आता पुन्हा एका वेगळ्या कॉन्सेप्ट आणि गंभीर विषयावर आधारित अनेक सिनेमा घेऊन आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि वेगळीच चर्चा रंगू लागली,जिला गंभीरतेची किनार आहे.
हेही वाचा: करण सोबतच्या वादावर कार्तिकनं सोडलं मौन; म्हणाला,'लोकं जे बोलत आहेत ते...'
आयुषमान खुरानाचा हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. या सिनेमात पहिल्यांदाच आयुषमान एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. सिनेमात तो अंडरकवर एजंटची भूमिका करीत आहे. अभिनव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमातून एक वेगळी कहाणी ऐकायला मिळणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येतं की सिनेमात भारताच्या नॉर्थ ईस्टमधलं गुन्हेगारी विश्व आणि राजकारण दाखवलं गेलं आहे. सिनेमाच्या ट्रेलरला आयुषमान खुरानानं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. आयुषमान सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय पहायला मिळतो. तो आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसतो. त्यानं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा ट्रेलर शेअर केलेला आहे. ट्रेलरमध्ये भारताच्या नाॉर्थ ईस्टमधील प्रॉब्लेम्सला दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याचबरोबर भाषांच्या आधारावर लोकांची केली गेलेली विभागणी यावरही भाष्य करण्यात आलं आहे. आयुषमान खुरानानं सिनेमाचा ट्रेलर शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''भाषा अनेक,संस्कृति अनेक,वेश अनेक...लेकिन देश का जज्बा सिर्फ एक-जीतेगा कौन? हिंदुस्थान!''
हा ट्रेलर जसा सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला तसा लगोलग व्हायरल झाला. या ट्रेलरवर अनेक प्रतिक्रिया आयुषमानच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. या सिनेमात आयुषमान पहिल्यांदाच एका अंडरकव्हर पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचं नाव या सिनेमात जोशुआ असं आहे. या भूमिकेसंदर्भात आयुषमाननं काही दिवसांपूर्वीच खुलासा केला होता.
हेही वाचा: Lockupp: नवी वॉर्डन तेजस्वी प्रकाश; 'फाटक्या' पण हटके ड्रेसमध्ये दिसली हॉट
आयुषमान आपल्या भूमिकेविषयी सांगताना म्हणालेला,''असं पहिल्यांदाच होत आहे जेव्हा प्रेक्षक मला या अवतारात पाहतील. मी याआधी पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली होती,परंतु असं पहिल्यांदा होईल जेव्हा प्रेक्षक मला अंडरकवर ऑफिसर म्हणून एका वेगळ्या अंदाजात पाहतील. या सिनेमातील जोशुआ खुप हुशार आहे,त्याला अडचणीतून मार्ग कसा काढायचा हे परफेक्ट माहितीय,तो केवळ शारिरीक क्षमतेवर नाही तर बुद्धिचा वापर करून शत्रूशी लढताना दिसेल. मी ही अशी भूमिका करण्यासाठी खूप उत्सुक होतो,कारण मला या भूमिकेनं खूप नाविन्य अनुभवण्यास दिलं. आयुषमाननं प्रेक्षकांनी आपल्याला सगळ्याचा भूमिकांमध्ये स्विकारलं यासाठी धन्यवाद देत सिनेमा २७ मे सा सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचंही खासकरून नमूद केलं.
Web Title: Ayushmann Khurrana Anek Movie Trailer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..