'त्यादिवशी माझा वाढदिवस होता,अख्खं ठाणं जळत होतं'; हेमांगीची पोस्ट चर्चेत Hemangi kavi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hemangi Kavi

'त्यादिवशी माझा वाढदिवस होता,अख्खं ठाणं जळत होतं'; हेमांगीची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री हेमांगी कवी(Hemangi kavi) सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते . ती नेहमीच आपल्या कामाविषयी सोशल मीडियावर अपडेट देत असताना वेैयक्तिक आयुष्यातील तिचे अनुभवही शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांत तर तिच्या अनेक वादग्रस्त अशा पोस्टमुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं गेलं. अनेकांना वाटलं नेहमी शांत-शांत वाटणारी हेमांगी अचानक एवढी टोकाच्या भूमिका घेत कशी बोलू लागली. पण जेव्हा हेमांगीशी यासंबंधात बोलणं झालं तेव्हा मात्र हेमांगीनं आपण पहिल्यापासूनच 'बंडखोर' आहोत असं स्पष्ट सांगितलं. आता पुन्हा हेमांगी चर्चेत आहे ते 'धर्मवीर मु.पोष्ट.ठाणे'(Dharamaveer) यासंदर्भात तिनं केलेल्या पोस्टमुळे.

हेही वाचा: 'बाळासाहेबांनी आदेश देऊनही आनंद दिघेंनी तो पाळला नव्हता कारण...'- प्रसाद ओक

हेमांगीनं 'धर्मवीर' सिनेमाविषयी एक पोस्ट लिहिली आहे. अर्थात खूप लांबलचक अशी ती पोस्ट वाचताना हे मात्र नक्की जाणवत आहे की हेमांगी त्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार आहे. हेमांगीनं माननीय आनंद दिघे साहेब यांना जवळून पाहिलं आहे त्यावेळचा प्रत्येक अनुभव धर्मवीर सिनेमासंबंधित लिहिताना तिनं सांगितला आहे. आनंद दिघेंचा रुबाब,त्यांचा ठाण्यातील दरारा,कायकर्त्यांमध्ये त्यांचं असलेलं स्थान,आणि त्यांच्यामुळे ठाण्याला लाभलेली शान सारं काही तिच्या पोस्टमधून डोळ्यासमोर उभं राहत आहे. मुळात हेमांगी कळवा-ठाणे इथली त्यावेळची रहिवाशी असल्यानं आनंद दिघे परिचित असणं हे आलंच. त्यामुळे या बातमीत जोडलेली तिची संबंध पोस्ट वाचलात तर एका आणखी सर्वसामान्य ठाणेकराच्या मनातील आनंद दिघेंचं अबाधित स्थान काय दर्जाचं होतं याची नक्कीच कल्पना येईल.

हेमांगीनं आनंद दिघे यांना झालेला अपघात आणि त्यानंतर त्यांचं झालेलं निधन प्रत्येक ठाणेकराला किती चटका लावून जाणारं होतं याचं केलेलं वर्णन आज इतक्या वर्षांनीही डोळ्यात चटकन पाणी आणेल. खरं तर हो,आनंद दिघेंचं असं जाणं आजही अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करून जातं. हेमांगीनं या पोस्टच्या माध्यमातून प्रसाद ओकनं हुबेहूब नजरेतनं आनंद दिघेंसारखी दाखवलेली जरब याचं तोंडभरून कौतूक केलंय. प्रसाद अभिनयात 'बाप' आहे असंदेखील ती म्हणाली आहे. हेमांगीची 'धर्मवीर' सिनेमा संदर्भातील ही पोस्ट काही वेळात तूफान व्हायरल झाली आहे.

Web Title: Hemangi Kavi Post On Dharmaveer Movie And Memory Of Anand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top