
'बाळासाहेबांनी आदेश देऊनही आनंद दिघेंनी तो पाळला नव्हता कारण...'- प्रसाद ओक
मंगेश देसाई निर्मित आणि प्रविण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर-मु.पो.ठाणे' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चत आहे. अर्थात आनंद दिघेंवरचा(Anand Dighe) बायोपिक(Biopic) हे एक मुख्य कारण होतच. पण आनंद दिघेंच्या भूमिकेत तंतोतंत त्यांच्यासारखा दिसलेला अभिनेता प्रसाक ओक पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांची सिनेमाविषयीची उत्सुकता अधिक वाढलेली दिसून येत आहे. प्रसाद ओकनं(Prasad Oak) सकाळ Unplugged या कार्यक्रमात पॉडकास्टच्या माध्यमातून आमच्याशी या सिनेमाविषयी आणि त्यातील भूमिकेविषयी मनमोकळा संवाद साधला आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसादने पॉडकास्ट मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या नात्याविषयी माहिती नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. त्यातलाच एक प्रसंग,गोड आठवण गुरुपौर्णिमेची. या बातमीत खाली पॉडकास्ट लिंक दिली आहे. मुलाखत नक्की ऐका.
'धर्मवीर मु.पो.ठाणे' हा सिनेमा आनंद दिघे यांचा बायोपिक आहे. ज्यामध्ये प्रसाद ओकने आनंद दिघे यांची व्यक्तीरेखा साकारली आहे. त्यानिमित्तानं त्याने सकाळशी पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधला आहे. 'गुरुपौर्णिमेला लपून बसलेल्या बाळासाहेबांना आनंद दिघेंनी कसं शोधून काढलं?' आनंद दिघेंच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि फारशी माहित नसलेली आठवण प्रसादनं शेअर केली आहे या मुलाखतीत,नक्की ऐका.
प्रसाद ओकनं याच मुलाखतीत ३० वर्षांनतर मिळालेला टायटल रोल याविषयी बोलताना मनातली खंतही व्यक्त केली आहे. आनंद दिघे यांच्या बायोपिक साठी जेव्हा पहिली लूक टेस्ट झाली तेव्हा ती का फेल गेली होती याचाही खुलासा प्रसादनं केला आहे. आनंद दिघेंसारखं हुबेहूब दिसावं म्हणून प्रसादचं नाक आणि दातासोबत काय प्रयोग करण्यात आलेयत याविषयी देखील प्रसादनं सांगितलं आहे. सिनेमातील बाळासाहेंबा सोबतचे सीन हे खास रीसर्च करून मांडण्यात आलेयत हे सांगताना त्या सत्य घटनांचा,किस्स्यांचा,आठवणींचा सुंदर परिपाठ आपल्या संवादातून मांडला आहे. तेव्हा बातमीत जोडलेली ही 'धर्मवीर मु.पो.ठाणे' सिनेमाच्या निमित्तानं प्रसाद ओकची घेतलेली मुलाखत नक्की ऐका.
हेही वाचा: अमिताभ यांच्या 'जलसा' बंगल्यातील प्रत्येक कोपरा बोलका; पहा Inside Photos
आनंद दिघे यांच्या निधनाच्या सीनविषयी सांगताना खूप काळजी घेतल्याचं प्रसाद ओक म्हणाला. ज्या दिवशी आनंद दिघेंचा मृत्यू झाला तेव्हा अख्खं ठाणं तर पेटून उठलंच होतं पण संबंध महाराष्ट्रात त्याची दाह पोहोचली होती. तेव्हा Controversy झाली होती. खूप उलट-सुलट चर्चा रंगल्या होत्या. त्याचा सिनेमात कशा पद्धतीनं उल्लेख केलाय त्या सीनसंदर्भातही प्रसादनं या मुलाखतीत मांडलं आहे. तेव्हा या बातमीत जोडलेली 'धर्मवीर मु.पो.ठाणे' या सिनेमाच्या निमित्तानं प्रसाद ओकनं दिलेली एक्सक्लुसिव्ह मुलाखत नक्की ऐका.
Web Title: Podcast Prasad Oak Interview Anand Dighe Dharmaveer Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..