कॅलेंडर, तुमच्यामुळे मला आईने खूप बडवलं..! Satish Kaushik यांच्या आठवणीत हेमांगीने सांगितला बालपणीचा किस्सा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satish kaushik, satish kaushik passed away, hemangi kavi

कॅलेंडर, तुमच्यामुळे मला आईने खूप बडवलं..! Satish Kaushik यांच्या आठवणीत हेमांगीने सांगितला बालपणीचा किस्सा..

Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सतिश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड गेले.

त्यांच्या निधनाने भारतीय मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलाय. अभिनेत्री हेमांगी कवीने सतीश कौशिक यांच्याविषयी खास पोस्ट करत श्रद्धांजली वाहिलीय

(hemangi kavi shared emotional memory about satish kaushik)

अभिनेत्री हेमांगी कवीने सतीश कौशिक यांचा एक खास फोटो पोस्ट केलाय. हेमांगी कवीने सतीश कौशिक यांना श्रद्धांजली देताना भावुक पोस्ट शेयर केलीय.

हेमांगी कवी लिहिते, Can we skip this day from our Calendar? लहानपणी आईने थोडा उशीर केला जेवण वाढायला की समोरचं ताट हातात घेऊन ते Glass ने बडवत “Calendar खाना दो” मोठमोठ्याने म्हणायचं.

मग आई “असं ताट वाजवू नये” म्हणून आम्हांला बडवायची. पण आम्ही कुठे ऐकतोय तिचं. ती जी सवय लागली ती आजतागायत. काय गंमत होती किंवा आहे त्यात कुणास ठाऊक.

हेमांगी पुढे लिहिते, तुमच्या सोबत काम करताना मी हा किस्सा तुम्हांला सांगितला तेव्हा तुम्ही हसून म्हणाला, “80-90s के हर बच्चे की यही कहानी है!” ८०-९० च्या दशकातल्या मुलांचं बालपण तुमच्या Calender ने समृद्ध केलंय आणि मनात कायमचं Tick ही करून ठेवलंय!

असं म्हणतात जुनं calendar घरात ठेऊ नये पण हे Calendar मनाच्या भिंतीवर, आठवणींच्या खिळ्याला सदा अडकवलेलं राहील. अशी पोस्ट लिहीत हेमांगीने सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनयच नव्हे तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका सतीश कौशिक यांनी वखूबी वठवल्या आहेत. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ रोजी हरियाणा इथं झाला.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. १९८७ मध्ये मिस्टर इंडिया या सिनेमातील कॅलेंडर या भूमिकेतून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.