Hera Pheri 3 सिनेमाला घेऊन सुनिल शेट्टीला सतावतेय 'ही' भीती.. म्हणाला,'शूट तर सुरु होतंय पण..' Suniel Shetty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hera Pheri 3

Hera Pheri 3 सिनेमाला घेऊन सुनिल शेट्टीला सतावतेय 'ही' भीती.. म्हणाला,'शूट तर सुरु होतंय पण..'

Hera Pheri 3 च्या घोषणेनंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. सिनेमाचं शूटिंग सुरु व्हायला मात्र अद्याप वेळ आहे. जवळपास ३ महिन्यानंतर याचं शूट सुरू होणार आहे. सिनेमात अक्षय कुमार सुनील शेट्टी,परेश रावल असणारच आहेत पण यावेळी संजय दत्त देखील एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवस आधीच ही बातमी आली आणि संजयच्या चाहत्यांमध्ये चैतन्य पहायला मिळालं. 'हेरा फेरी ३' फरहाद सामजी दिग्दर्शित करणार आहे. सोशल मीडियावरील ट्रेन्ड पाहता लक्षात येतंय की लोकांना मात्र फरहाद सामजीनं या सिनेमाचं दिग्दर्शन करणं फारसं रुचलेलं नाही.

एकीकडे चाहत्यांना ही गोष्ट सतावतेय तर दुसरीकडे सुनील शेट्टीला सिनेमाविषयी भलतीच चिंता त्रस्त करून सोडतेय.(Hera Pher 3 suniel shetty spoke about the feat attached with the film)

नुकतंच सुनील शेट्टीनं आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. जवळपास दोन दशकानंतर अक्षय कुमार,परेश रावल,सुनील शेट्टी या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र येणार आहेत. सिनेमासाठी उत्सुक असलेल्या सुनील शेट्टीनं नुकतीच पिंकविला या वेबसाईटला एक मुलाखत दिली.

तो म्हणाला,''हा सिनेमा म्हणजे राजू,श्याम आणि बाबू भय्याचा एक प्रवास असणार आहे. आणि त्याच व्यक्तिरेखा असल्यामुळे कथेच्या अनुषंगाने थोडे फार बदल असतील पण बाकी फार काही चेंजेस नसणार. मला फक्त इतकंच माहितीय की ही एक उत्तम स्क्रिप्ट आहे. ही एक इमोशनल जर्नी असणार आहे. पुन्हा त्या तीन लोकांच्या संघर्षाची कहाणी''.

सुनील शेट्टी पुढे म्हणाला की,''सिनेमात संजय दत्तची महत्त्वपूर्ण भूमिका आहे''. त्यानं सिनेमाला घेऊन आपल्या मनातील भीतीही बोलून दाखवली.

सुनील म्हणाला,''मला फक्त इतकीच भीती वाटते की आम्ही थोडंबहूत जरी ओरिजनलच्या जवळ पोहोचायला हवं. त्याविषयी थोडी शंका वाटत राहते उगाच. मला वाटतं जर आम्ही ईमानदारीनं काम केलं आणि सिनेमाचा ओरिजनलपणा जपून ठेवला तर लोकांना हा सिनेमा नक्कीच पसंत येईल''.

''हेराफेरी चे दोन्ही भाग खूप मनापासून बनवले होते आणि दोन्ही भागांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे आता तिसरा भाग कधी बनून रिलीज होतोय याची आम्हाला देखील आतुरता आहे''.

सुनील शेट्टीन सांगितलं की 'हेराफेरी ३' चं शूटिंग या वर्षाच्या मध्यापर्यंत सुरू होईल. या सिनेमाव्यतिरिक्त 'भागम भाग' आणि 'आवारा पागल दिवाना'चा सीक्वेल देखील येत असल्याचं सुनील शेट्टी म्हणाला.