
Hera Pheri 3 संदर्भात मोठी अपडेट..बोलता बोलता परेश रावल यांनी सांगून टाकला कथेतला मोठा ट्विस्ट
Hera Pheri 3 Big Update: अक्षय कुमार,परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्या 'हेरा फेरी' सीरिजचे लोक दिवाने आहेत. पहिल्या दोन सीक्वेल हिट ठरलेल्या 'हेराफेरी' सिनेमाचा तिसरा भाग कधी येतोय आता याकडे सगळे डोळे लावून बसलेयत.
काही दिवसांपूर्वीच बातमी होती की अक्षय कुमारला काही गोष्टी न पटल्यानं यावेळी तो 'हेराफेरी ३' मध्ये दिसणार नाही. त्यामुळे अक्षयचे चाहते मात्र भलतेच नाराज झाले होते. पण अखेर गोष्टी नीट झाल्या आणि अक्षयने या आठवड्याच्या सुरुवातीला परेश रावल आणि सुनील शेट्टी सोबत टीझर शूट केला.
आता एका मुलाखतीत परेश रावल यांनी 'हेराफेरी ३' विषयी संवाद साधला आहे. त्यांनी हा देखील खुलासा केला की कार्तिक आर्यन या सिनेमाचा भाग नाही.(Hera Pheri 3 big update..paresh rawal reveal script)
एका प्रसिद्धि माध्यमाशी बोलताना,दिग्गज अभिनेता परेश रावल यांनी सांगितलं की कार्तिक आर्यन या सिनेमाचा भाग नाही. त्यांनी सांगितलं,''मला जितकं माहित आहे त्यानुसार सुरवातीला कार्तिक आर्यन आणि अक्षय कुमार दोघंही या सिनेमात होते''.
''पण हे जुळून आलं नाही. मला माहित नाही नेमकं काय झालं ते. परेश रावल यांनी हा देखील खुलासा केला की टीझर नुकताच शूट केला गेला होता आणि सिनेमाचं शूटिंग पुढील तीन महिन्यात सुरु होईल''.
''त्यांनी बोलता बोलता सिनेमातला इंटरनॅशनल ट्वीस्टही सांगितला आहे. ते म्हणालेयत, ''यावेळी राजू,श्याम आणि बाबू भैय्या परदेशात गेलेले दिसतील''.
परेश रावल पुढे म्हणाले की,''आम्ही तीन महिन्यात शूटिंग सुरू करू. मुंबईत एक मोठं शेड्युल पूर्ण झाल्यावर दुबई,अबूधाबी,लॉस एंजलिस सारख्या देशांमध्ये बाबू भैय्या, राजू आणि श्याम शूटिंगसाठी जातील''.
''आम्ही परदेशात जाणार आणि जागतिक पातळीवर हेराफेरी करणार आहोत. तसंच,अक्षय,सुनिल सोबत शूटिंग करणं म्हणजे घरी आल्याचा भास...घरचा सहवास..त्यांच्यासोबत शूटिंग करणं म्हणजे नुसता आनंद''.
परेश रावल म्हणाले,''अक्षय आणि सुनील सोबत शूटिंग करताना नेहमीच धमाल येते. ते प्रतिभाशाली अभिनेते आहेत. ते आपल्या कामाप्रती असुरक्षित भावना मनात बाळगून नाहीत. आम्ही एकमेकांचा खूप सम्मान करतो. आमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री ऑनस्क्रीनही झळकते''.
'हेराफेरी ३' फरहाद सामजी दिग्दर्शित करणार असल्याचं सांगितलं जात आहे,ज्याने 'किसी का भाई,किसी की जान' हा सलमान खान,पूजा हेगडे यांनी अभिनय साकारलेला सिनेमा दिग्दर्शित केला आहे.