..म्हणून श्रेयसने लग्न केल्याचं सर्वांपासून लपवलं होतं

प्रिमिअम शोला श्रेयसच्या पत्नीने दिग्दर्शक नागेश कुकनूरची बहीण म्हणून उपस्थिती लावली होती.
Shreyas and Dipti Talpade
Shreyas and Dipti Talpade

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे Shreyas Talpade. श्रेयसने 2007 साली दिप्ती तळपदेसोबत Dipti Talpade लग्न केले. काही दिवसांपूर्वी श्रेयसने एका मुलाखतीमध्ये त्याच्या लग्नाबद्दल एक खुलासा केला. त्याने सांगितले की, 'इकबाल’ Iqbal या चित्रपटासाठी त्याला दिप्तीसोबतचे नाते लपवावे लागले होते. (here is why Shreyas talpade kept his wedding with dipti under wraps)

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागेश कुकनूर यांच्यासोबत श्रेयसने 'इकबाल' आणि 'डोर' हे दोन चित्रपट केले आहेत. त्यामधील 'इकबाल' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी श्रेयसने नागेशला 31 डिसेंबरला सुट्टी मागितली होती. त्यावेळी नागेशला वाटले की श्रेयस न्यू ईयरच्या पार्टीसाठी सुट्टी मागत आहे. जेव्हा त्याने श्रेयसला सुट्टीचे कारण विचारले, तेव्हा श्रेयसने सांगितले की तो लग्न करत आहे. नागेशने हे ऐकताच त्याला लग्न न करण्यास सांगितले.

Shreyas and Dipti Talpade
TRP न मिळाल्याने फ्लॉप झालेल्या मराठी मालिका

श्रेयसने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले, "मी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. त्यावेळी माझ्या लग्नाच्या पत्रिकादेखील वाटल्या गेल्या होत्या. पण नागेशने मला लग्न रद्द करण्यास सांगितले. मला तेव्हा कळालेच नाही की मी काय करावे. मी त्याला सुट्टीसाठी खूप विनवण्या केल्या. त्यानंतर मी नागेशकडे एक दिवसाचीच सुट्टी मागितली आणि लग्न कोणालाही न सांगता गुपचूप करेन असे सांगितले तेव्हा नागेशने मला सुट्टी दिली."

नागेशने श्रेयसला लग्न न करण्यास सांगण्यामागचे कारण श्रेयसची 'इकबाल' या चित्रपटातील भूमिका हे होते. नागेशचे असे मत होते की, 'इकबाल' चित्रपटात श्रेयस 17-18 वर्षाच्या मुलाची भूमिका करत होता. त्यामुळे त्याने रिअल लाइफमध्ये लग्न केले, तर त्याच्या भूमिकेवर परिणाम होईल. या चिपटाच्या प्रमोशनवेळी श्रेयसने त्याच्या लग्नाबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या प्रिमियम शोला श्रेयसच्या बायकोने म्हणजेच दिप्तीने नागेशची बहीण म्हणून उपस्थिती लावली होती. त्यावेळी 'इकबाल' चित्रपटाचे निर्माते सुभाष घई यांना दिप्ती ही श्रेयसची बायको आहे हे माहीत देखील नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com