'हे तर काहीच नाय'च्या मंचावर कलाकारांचे धमाल किस्से

गिरीश ओक, संजय मोने हे एकदा वांद्रे इथून माहीमला जात होते, तेव्हा पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली आणि..
Hey Tar Kahich Nahi
Hey Tar Kahich Nahi

'हे तर काहीच नाय' (Hey Tar Kahich Nahi) या कार्यक्रमातून कलाकार मजेदार किस्से सांगून प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करतात. त्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता आहे. काही कलाकार हे स्वतःच इतके मिश्किल स्वभावाचे असतात की त्यांच्यासोबत घडलेले किस्सेदेखील तितकेच धमाल असतात. त्यात आवर्जून उल्लेख करावा असे कलाकार म्हणजे संजय मोने (Sanjay Mone) आणि संजय नार्वेकर (Sanjay Narvekar). येत्या आठवड्यात हे तर काहीच नायच्या मंचावर संजय मोने स्वतः प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत. पण त्यांचे किस्से हे न संपणारे आहेत, त्यामुळे उपस्थित कलाकारांपैकी गिरीश ओक (Girish Oak) यांनीदेखील संजय मोने यांचे किस्से सांगून सगळ्यांना हसवून लोटपोट केलं.

गिरीश ओक आणि संजय मोने हे एकदा वांद्रे इथून माहीमला जात होते, तेव्हा पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली. त्यावेळी पोलीस आणि मोने यांच्यातील विनोदी संभाषण गिरीश ओक यांनी सांगितलं. तसेच गिरीश ओक यांच्या नावावर संजय मोने पुण्यातील एक किस्सा नेहमी सगळ्यांना सांगतात, तो किस्सा नेमका कुठला? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. तर अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी संजय नार्वेकर यांच्यासोबतचे किस्से सांगितले.

Hey Tar Kahich Nahi
'पुष्पा'वर बंदी घाला; गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

अतुल परचुरे आणि संजय नार्वेकर एकदा बाईकवरून जात असताना बाईक चालवत असलेल्या अतुलचे डोळे भर ट्रॅफिकमध्ये बंद केले आणि त्यांना बाईक चालवायला सांगितली. पुढे काय झालं, हे प्रेक्षकांना या भागात ऐकायला मिळेल. या कार्यक्रमाचा आगामी भाग शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गिरीश ओक, अतुल परचुरे, संजय मोने यांच्या सोबतच आगामी भागात अदिती सारंगधर, मनसे नेता संदीप देशपांडे आणि मेघा घाडगे हे कलाकार देखील या मंचावर सज्ज होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com