'आशिक बनाया आपने'.. हे गाणं आलं आणि हिमेश रेशमियाचे दिवस पालटले..

गायक हिमेश रेशमियाचा आज वाढदिवस.. त्या निमित्ताने ही खास आठवण..
himesh reshammiya birthday his success story after ashiq banaya song
himesh reshammiya birthday his success story after ashiq banaya song esakal

himesh reshmmiya birthday : गायक आणि अभिनेता अशी ख्याती असलेला हिमेश रेशमियायाचा आज 49 वा वाढदिवस. हिमेशने मिळालेल्या प्रसिद्धीवर चित्रपटातही आपले नशीब आजमावले. पण एक वेळ अशी होती की हिमेशच्या स्टाइलची, पेहरावाची आणि पर्यायाने गाण्याची बरीच थट्टा केली गेली. पण एका गाण्याने त्याचे नशीब पालटले आणि बॉलीवुड मधील नामांकित गायकांच्या यादीत त्यांचे नाव कोरले गेले. (himesh reshammiya birthday his success story after ashiq banaya song)

आपल्या अनोख्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर वेगळी छाप सोडणाऱ्या हिमेश रेशमियाचे आयुष्य एखाद्या चित्रपटासारखे आहे. 'आशिक बनाया' , 'झलक दिखला जा', 'हुक्का मार' अशा एकापेक्षा एक सुपरहिट गाण्यांनी चाहत्यांना वेड लावणारा हिमेश रेशमिया एकेकाळी डावलला गेला होता. हिमेशने गाण्याचा एक वेगळा ठसा संगीत विश्वात निर्माण केला.

हिमेश रेशमियाने आपल्या जिद्दीवर गायन, संगीत दिग्दर्शन आणि अभिनयातही पाय रोवले. जवळपास 20 वर्षे तो संगीत क्षेत्रात काम करत आहे. तो केवळ गायक नही तर तो माणूस म्हणूनही तितकाच मोठा आहे. हिमेशने अनेक गरजूंना मदत केली आहे. एवढेच नाही तर रस्त्यावर गाणे गाऊन पोट भरणाऱ्या राणू मंडल यांनाही त्याने मदत केली. आज हिमेश रेशमिया याला एक मानाचे स्थान मिळाले असते तरी त्यांच्या 'आशिक बनाया'ची किमया आजही कायम आहे, जया गाण्याने त्याला ओळख मिळवून दिली होती. या गाण्यात इम्रान हाशमी आणि तनुश्री दत्ताचा कीसिंग सीन चांगलाच गाजला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com