esakal | 'वडिलांच्या निधनानंतर आईचं सांत्वनही करू शकले नाही'; हिना खानची हतबलता
sakal

बोलून बातमी शोधा

Hina Khan

'वडिलांच्या निधनानंतर आईचं सांत्वनही करू शकले नाही'; हिना खानची हतबलता

sakal_logo
By
स्वाती वेमूल

वडिलांच्या निधनानंतर आईला भेटून तिचं सांत्वनही करू शकत नसल्याची खंत अभिनेत्री हिना खानने व्यक्त केली. हिनाच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं. त्यावेळी ती शूटिंगनिमित्त मुंबईबाहेर होती. वडिलांच्या निधनाचं वृत्त समजताच ती परतली. मात्र आल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाली. आता हिना क्वारंटाइनमध्ये राहत असल्याने तिला तिच्या आईलाही भेटता येत नाहीये. याचंच दु:ख तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्यक्त केलं.

हिनाने क्वारंटाइनमधील तिचे फोटो पोस्ट करत लिहिलं, 'एक हतबल मुलगी. जेव्हा तिच्या आईला तिची सर्वाधिक गरज असताना ती सांत्वन करायला त्यांच्यासोबत राहू शकत नाही. ही वेळ फार कठीण आहे, फक्त आपल्यासाठीच नाही तर सर्वांसाठी. पण म्हणतात ना, कठीण काळ फार वेळ राहत नाही, पण या काळात स्ट्राँग राहणारे लोक राहतात. मी माझ्या वडिलांची स्ट्राँग मुलगी आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा.'

हेही वाचा : 'निरोपही देता आला नाही'; अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचं कोरोनाने निधन

अभिनेत्री गौहर खान, हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल, अभिनेता अर्जुन बिजलानी, प्रियांक शर्मा, अमृता खानविलकर यांनी कमेंट करत हिनाला धीर देण्याचा प्रयत्न केला. याआधी हिनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

loading image