
'झुंड' या चित्रपटाची अनेक दिवस फक्त चर्चाच सुरू होती. याचा पोस्टर, टीझर, ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. काल या चित्रपटाचं पोस्टर खुद्द 'बिग बीं'नी शेअर केलाय आणि आज या चित्रपटाचं टीझर लॉन्च झालंय.
'सैराट'फेम नागराज मंजुळेच्या 'झुंड' या चित्रपटाची अनेक दिवस फक्त चर्चाच सुरू होती. याचा पोस्टर, टीझर, ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. काल या चित्रपटाचं पोस्टर खुद्द 'बिग बीं'नी शेअर केलाय आणि आज या चित्रपटाचं टीझर लॉन्च झालंय.
पहिलाच चित्रपट केला सैफसोबत, कोण आहे ही बॉलिवूडची हॉट न्यूकमर ?
टीझरवरून हा चित्रपट बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार असं दिसतंय. गरीब परिस्थितीतले फुटबॉल खेळाडू आणि त्यांचे कोच यांच्या संघर्षमय कहाणीवर हा चित्रपट बेतलेला आहे. टीझरमध्ये मुलांचा एक ग्रुप चालत जातोय. त्यांच्या हातात लाकूड, विटा, साखळ्या आहेत. सगळी मुलं झोपडपट्टीतली, गरिब घरातंली आणि गुन्हेगार प्रवृत्तीची आहेत. त्यांना सरळ करून मार्गी लावणारा फुटबॉल कोच त्यांना भेटतो आणि मग पुढे काय होतं याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. अमिताभ यांचा अभिनय आणि अजय-अतुल यांच्या संगीतामुळे या चित्रटाला चार चाँद लागलेत.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केले 'झुंड'चे पहिले पोस्टर, पाहिले का?
झोपडपट्टीतील अशिक्षित व गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून देणारे नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित 'झुंड' या हिंदी चित्रपटाचे नागपूरमध्ये शुटींग झाले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारणार आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा 'झुंड' हा पहिला हिंदी चित्रपट आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले असल्यानं झुंडबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. अमिताभ यांनी पहिले पोस्टर शेअर करताना म्हटले आहे, की झुंड चित्रपटाची पहिली झलक घेऊन येत आहे.