esakal | 'आमच्याशी त्यांची तुलना करता येणार नाही' 

बोलून बातमी शोधा

hollywood actor brad pitt wished saif ali khan kareena kapoor khan wedding good looking couple}

ते जेव्हा सोशल मीडियातून सगळीकडे पसरले तेव्हा त्या जोडप्याला प्रचंड आनंद झाला.  

manoranjan
'आमच्याशी त्यांची तुलना करता येणार नाही' 
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - ब्रॅड पिटला कोण ओळखत नाही. जगातली सर्वात सुंदर अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. केवळ सुंदर दिसतो म्हणून त्याची ओळख नाही तर अभिनयातही त्यानं नैपूण्य मिळवलं आहे. ब्रॅड पिटनं बॉलीवूडच्या प्रसिध्द अभिनेता आणि अभिनेत्रीबद्दल दोन शब्द कौतूकाचे काढले होते. ते जेव्हा सोशल मीडियातून सगळीकडे पसरले तेव्हा त्या जोडप्याला प्रचंड आनंद झाला. आता चक्क ब्रॅड पिटच कौतूक  करतो आहे तिथे काय बोलावं असा प्रश्न त्यांना कदाचित पडला असावा. सैफ अली खान आणि करिना कपूर ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील प्रचंड लोकप्रिय असणारे कपल आहे.

सैफ आणि करिना हे त्यांच्या प्रोफेशनल गोष्टींपेक्षा त्यांच्या पर्सनल गोष्टींसाठी जास्त प्रसिध्द आहे. त्याची चर्चा नेहमीच होत असते. तुम्हाला कदाचित एक खास बाब त्या दोघांविषयी सांगितल्यास खोटे वाटेल ते म्हणजे सैफ आणि करिनाची तुलना ही नेहमी ब्रॅड पिट, अँजेलिनाशी होत असते. थोडक्यात त्यांना हॉलीवूडचे ब्रॅड,अँजेलिना म्हटले जाते. मात्र एका मुलाखती दरम्यान ब्रॅडनं त्यांच्याविषयी कौतूक केले आहे. ब्रॅड जे म्हणाला त्यानंतर सैफ करिनाच्या फॅन्सनं त्याला धन्यवाद दिले आहेत.

आता ब्रॅड आणि अँजेलिना यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना कमालीचे वाईट वाटले होते. आपल्याला आवडणारे कलाकार असा टोकाचा निर्णय घेतील याची त्यांना कल्पना नव्हती. एका मुलाखतीत ब्रॅडनं सैफ करिनाविषयी सांगितले होते की, मला खूप आनंद होतो आहे की ते दोघे लग्न करत आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जेव्हा ब्रॅडला असा एक प्रश्न विचारण्यात आला की, त्या दोघांना तुमच्याशी कंपेअर करता येईल का, तेव्हा ब्रॅडनं उत्तर दिलं होतं की, त्यांची जोडी खूप सुंदर आहे. आमच्याशी त्यांची तुलना करता येणार नाही. मला वाटत नाही की त्यांची तुलना आमच्याशी व्हावी.

टशन या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी सैफ आणि करिना एकमेकांच्या प्रेमात पड़ले होते. चार वर्षांपर्यत त्यांनी एकमेकांना डेट केले. त्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली असून सैफचे अगोदर अमृत सिंहशी लग्न झाले होते.