Mark Ruffalo: हल्कनं काढलं ब्राझीलियन राष्ट्रपतींचं माप! 'त्यांना तर...'

अँव्हेंजरमध्ये हल्कची भूमिका करणारा मार्क (Mark Ruffalo) नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे.
Hollywood Actor Mark Ruffalo
Hollywood Actor Mark Ruffalo esakal

Hollywood News: अँव्हेंजरमध्ये हल्कची भूमिका करणारा मार्क (Mark Ruffalo) हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणाऱ्या या अभिनेत्याचा (Hollywood Actor) चाहतावर्गही मोठा आहे. भारतातही त्याचे असंख्य चाहते आहे. अभिनयाशिवाय तो त्याच्या आक्रमक स्वभावामुळेही ओळखला जातो. यापूर्वी (Entertainment News) देखील तो त्याच्या प्रतिक्रियेमुळे अडचणीतही आला होता. आता त्यानं चक्क ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका केली आहे. ती प्रतिक्रिया जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा मात्र मार्कवर देखील जोरदार कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

ब्राझीलियन राष्ट्रपतींना लोकशाहीचा आदर नाही. असं सणसणीत वक्तव्य मार्कनं केलं आहे. अमेरिकन कलाकार मार्क रॉफेलो हा जगभर त्याच्या स्टंटबाजीसाठी प्रसिद्ध असणारा कलाकार आहे. त्यानं केलेल्या राजकीय विधानामुळे उलट सुलट प्रतिक्रियांना उधाण आले आहे. मार्कनं या अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी ब्राझीलियन राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांची भेट घेण्यापूर्वीच बोल्सोनारो यांच्यावर टीका केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, बोल्सोनारो हे लोकशाहीचा मान ठेवत नाही. ते सातत्यानं सत्ता परिवर्तनाची धमकी देत असतात. त्यांना यापूर्वी अनेकदा याविषयी सांगण्यात आले आहे. मात्र ते सोशल मीडियावर यामुळेच ट्रोल होत आहेत.

मार्कच्या त्या वक्तव्यावर बोल्सोनारो यांनी देखील उत्तर दिलं आहे. कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही. मार्क जे काही बोलला त्याला फारसं महत्व देता कामा नये. मला एक गोष्ट माहिती आहे की, त्यानं ब्राझिलियन संविधान काही वाचलेलं नाही. माझं सरकार हे नेहमीच लोकशाहीचा आदर करणारं होतं आणि असेल. यात मला तीळमात्र शंका नाही. ज्यांना कुणाला मी लोकशाहीचा आदर करत नाही असे वाटते त्यांना मी सांगु इच्छितो की, आपण स्वता खात्री करावी आणि मग त्यावर प्रतिक्रिया द्यावी. माझ्याकडून कधीही लोकशाहीचा अनादर झालेला नाही. ही गोष्ट मला आवर्जुन सांगावीशी वाटते.

Hollywood Actor Mark Ruffalo
बॉलीवूड अभिनेत्रीसोबतचं डेटिंग अन् धोका; कार्तिक आर्यननं अखेर केलं मान्य

नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन आणि बोल्सोनारो यांची भेट झाली. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्हायरल झाल्या होत्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया म्हणजे मार्कची होती. त्याच्या प्रतिक्रियेवरुन सोशल मीडियावर बराच वेळेपासून चर्चा सुरु होती.

Hollywood Actor Mark Ruffalo
कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोना; 'भूलभूलैय्या2' स्टाइलनं दिली माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com