बॉलीवूड अभिनेत्रीसोबतचं डेटिंग अन् धोका; कार्तिक आर्यननं अखेर केलं मान्य Kartik Aaryan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan confesses to dating a Bollywood actress

बॉलीवूड अभिनेत्रीसोबतचं डेटिंग अन् धोका; कार्तिक आर्यननं अखेर केलं मान्य

कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) सध्या त्याच्या 'भूलभूलैय्या २' सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. मोठ्या कालावधीनंतर त्याच्या 'भूलभूलैय्या २' सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यानं आता बॉलीवूडमध्ये सूटकेचा निःश्वास टाकला आहे. 'भूलभूलैय्या २' सिनेमाच्या निमित्तानं त्यानं दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीत त्यानं आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं आहे. त्यानं या मुलाखतीत आपण बॉलीवूड अभिनेत्रीला डेट करत होतो यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.(Kartik Aaryan confesses to dating a Bollywood actress)

हेही वाचा: 'आश्रम' च्या सेटवर प्रकाश झा यांच्यावर हल्ला; म्हणाले,'तब्बल एक तास...'

. कार्तिकनं या मुलाखतीत बॉलीवूडमध्ये प्रेमात मिळणारा धोका आणि दोन कलाकारांचे नाव मीडिया कसे जोडते यावरही स्पष्ट वक्तव्य केलं आहे. कार्तिक आर्यनचं नाव सारा अली खानसोबत जोडलं गेलं होतं. दोघांच्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या बातम्या खूप दिवस मीडियाच्या हेडलाइन्समध्ये होत्या.

हेही वाचा: हर्षद मेहतानंतर आता मास्टरमाइंड तेलगी वर वेबसिरीज; 'Scam 2003' चर्चेत

डेटिंगवर काय बोलला कार्तिक आर्यन?

कार्तिक आर्यन सध्या 'भूलभूलैय्या २'चं यश एन्जॉय करीत आहे. सिनेमानं चार दिवसांत ६६.७१ करोड कमावले आहेत. एका युट्युब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठे खुलासे केले आहेत. बॉलीवूड अभिनेत्रीला आपण डेट करत होतो याविषयी त्यानं पहिल्यांदाच भाष्य करताना 'हो' म्हटलं आहे. बॉलीवूडमध्ये मिळणाऱ्या धोक्यांविषयी विचारलं तेव्हा तो म्हणाला,''जेव्हा दोन कलाकार एकत्र काम करतात तेव्हा ते कॉफी पिण्यासाठी जातात. तेव्हा लगेच मीडिया म्हणते,या दोघांना एकत्र पाहिलं गेलं आणि मग अफेअरच्या चर्चा सुरू होतात''.

हेही वाचा: कंगनाच्या 'धाकड' चे शो कॅन्सल, कार्तिकच्या 'भूलभूलैय्या 2' ने केलं गारद

आता यामुळे मी बाहेर जाणं बंद करू का? किंवा सीक्रेट जागा शोधू? दोन कलाकार केवळ मित्र म्हणूनही भेटू शकतात.जर चार कलाकार बाहेर गेले तर फोटो दोघांचाच छापून येतो. आणि म्हणूनच खूप विचित्र वाटतं. कार्तिक आर्यनचं नाव सारा अली खान(Sara Ali Khan)सोबत जोडलं गेलं होतं. त्यांचे 'लव आज कल' सिनेमानंतर ब्रेकअप झाले अशा बातम्या होत्या. पण त्यानंतर त्याचं नाव अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं होतं.

Web Title: Kartik Aaryan Confesses To Dating A Bollywood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top