'मिस्टर बीन' गेले?; सोशल मीडियावर व्हायरल, खरं काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'मिस्टर बीन' गेले?; सोशल मीडियावर व्हायरल, खरं काय?
'मिस्टर बीन' गेले?; सोशल मीडियावर व्हायरल, खरं काय?

'मिस्टर बीन' गेले?; सोशल मीडियावर व्हायरल, खरं काय?

सोशल मी़डियाचा अतिरेक हा वाईटच असे अनेकदा दिसून आले आहे. जगातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींना याचा अंदाजही आला आहे. आतापर्यत सोशल मीडियावर कित्येक सेलिब्रेटींना त्यांच्या निधनापूर्वीच मारल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्यानंतर त्यांनी खुलासा करुन आपण अजून जिवंत असल्याचे सांगितले आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार लकी अली यांच्याबाबत असाच काहीसा प्रकार घडला होता. अखेर चाहत्यांच्या आग्रहास्तव त्यांना आपण अजून हयात आहोत याचा खुलासा करावा लागला होता.

असाच काहीसा प्रकार आता हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते रोवन अटकिन्सन यांच्याबाबत घडला आहे. ते मिस्टर बीन या नावानं प्रसिद्ध आहे. सध्या काही दिवसांपासून मिस्टर बीन यांचे निधन झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्या व्टिटमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, एका कारच्या अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. तर आणखी दुसऱ्या व्टिटमध्ये 18 मार्च 2017 मध्ये झालेल्या एका व्टिटमध्ये कारमधील अपघातामध्ये 58 वर्षीय कॉमेडियन मिस्टर बीन यांचे निधन झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. यामुळे बीन यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

मिस्टर बीन गेल्याची बातमी ही 2018 मध्ये व्हायरल झाली होती. त्यावेळी या खोट्या बातमीला अनेकांनी खरे मानले होते. त्यामुळे बीन यांच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात धक्काही बसला होता. 2016 मध्ये देखील काही लोकांनी बिन यांच्या जाण्याविषयीच्या बातम्या व्हायरल केल्या होत्या. त्यामध्ये बीन यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आता जी बातमी व्हायरल केली जात आहे ती पूर्णपणे चूकीची आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नसल्याचे सांगण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे 2017 मध्ये मिस्टर बीन यांचे वय 58 नव्हे तर 62 इतके होते. एवढचं नाहीतर आणखी एका चाहत्यानं लिहिलं आहे की, फेसबूकवर दरवर्षी बीन यांचे निधन होत असते.

हेही वाचा: तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

loading image
go to top