Avatar The Way Of Water: देशोदेशी जाऊन प्रमोशन करणं भोवलं... जेम्स कॅमेरॉन यांना कोरोनाची लागण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Avatar The Way Of Water
James Cameron

Avatar The Way Of Water: देशोदेशी जाऊन प्रमोशन करणं भोवलं... जेम्स कॅमरुन यांना कोरोनाची लागण...

'अवतार द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. 'अवतार द वे ऑफ वॉटर' लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. भारतात तर या चित्रपटाचं प्रीबुकिंगही झालं फुल झालं आहे. सोमवारी लॉस एंजेलिसमध्ये प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून या कार्यक्रमाचा भाग होऊ शकले नाहीत.

(James Cameron Is Corona Positive)

हेही वाचा: Avatar 2 : 'असा चित्रपट होणे नाही!' अवतार 2 पाहिल्यावर समीक्षक भारावले

रिपोर्ट्सनुसार जेम्स कॅमेरून यांना कोरोनाची लागण झाली आहे.जेम्स कॅमेरून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती रविवारी त्यांच्या नियमित तपासणीदरम्यान समोर आली. कॅमेरॉन 'अवतार 2' च्या प्रीमियरला ते हजर राहू शकले नाहीत, परंतु ते डिजिटल पद्धतीने या कार्यक्रमाचा भाग बनले. यावेळी त्यांनी त्यांच्या तब्येतीची माहिती दिली.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

कॅमेरून म्हणाले, 'आज येथे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाची मी माफी मागतो. मी माझ्या स्वतःच्या पार्टीला जाऊ शकत नाही. मी अवतार २ च्या प्रीमियरसाठी जगभर फिरत होतो आणि टोकियोहून परत आल्यानंतर माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. म्हणूनच मी प्रीमियरला येऊन अधिक लोकांसाठी धोका बनू शकत नाही.

हेही वाचा: Avatar the way of water: हिंदू देव-देवता 'अवतार'ची प्रेरणा! दिग्दर्शक कॅमेरुनची प्रतिक्रिया

त्याच वेळी, जेम्स कॅमेरॉनच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना डिस्नेच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'जेम्सला कोविड आहे पण आता त्यांना बरे वाटत आहे. रुटीन चेकअप दरम्यान त्याचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली. अशा परिस्थीतीत ते प्रीमियरला उपस्थित राहणार नाही. 'अवतार द वे ऑफ वॉटर' बद्दल सांगायचं तर हा सिनेमा १६ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्याच वेळी, चित्रपटाचा पहिला भाग 18 डिसेंबर 2009 रोजी प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.