esakal | भर पार्टीत बायकोला ओरडला, चर्चा जस्टिनच्या व्हिडिओची
sakal

बोलून बातमी शोधा

justin and hailey

भर पार्टीत बायकोला ओरडला, चर्चा जस्टिनच्या व्हिडिओची

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई. कॅनेडियन पॉप सिंगर जस्टिन बीबर (pop singer justin biber) हा त्याच्या हटके स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. गायकीसाठी त्याची पॉप्युलॅरिटी सर्वांना माहिती आहे. मात्र चिडखोर स्वभावामुळे तो अनेकदा ट्रोलही झाला आहे. सोशल मीडियाच्या (social media) सर्व प्लॅटफॉर्मवर त्याला लाखो चाहते आहेत. सध्या तो चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं आपल्या पत्नीला भर पार्टीत अपमानित केल्याची घटना समोर आली आहे. जस्टीन जिथे जातो तिथे त्याच्या चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे त्याच्या सर्व हालचालींवर त्यांचे बारकाईनं लक्ष असते. (hollywood pop singer justin bieber screamed at his wife in front of everyone yst88)

एका चाहत्यानं जस्टीनं आपल्या पत्नीला मोठ्यानं ओरडत असल्याचा व्हिडिओ शेयर केल्याचे दिसुन आले आहे. हेली बाल्डविन (hailey baldwin) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. ती एक प्रख्यात मॉडेलही आहे. चाहत्यानं त्या व्हिडिओला सर्वप्रथम टिकटॉकवर शेयर केले होते. त्यानंतर तो फेसबूक, व्टिटरवर शेयर झाला आहे. कॅनाडियन सिंगर म्हणून जस्टीननं कमी वयात प्रचंड लोकप्रियता प्राप्त केली आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये जस्टिन एका हॉटेलच्या लॉबीमध्ये हेलीला ओरडताना दिसत आहे. त्यामुळए त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत. जस्टीन अशाप्रकारे हेलीला ओरडेल असे त्यांना वाटले नव्हते.

जस्टिन आणि हेली यांच्या बरोबर त्यांचे बॉडीगार्डही आहेत. जस्टीन हेलीच्या दिशेनं बोट करुन तिला मोठमोठ्यानं ओरडत आहे. त्यामुळे त्याठिकाणी असणाऱ्या सर्व चाहत्यांचे लक्ष त्यांच्या भांडणाकडे गेले आहे. आता त्यांच्यात काही बोलणं सुरु आहे की, ते एकमेकांशी भांडत आहेत हे कळायला काही मार्ग नाही. मात्र त्यांच्या चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, ते मोठ्यानं बोलून एकमेकांवर ओरडत आहेत. एकप्रकारे जस्टीनची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्नातून त्याचा तो व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे.

हेही वाचा: प्राजक्ता लवकरच उलघडणार 'गुपित'; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हेही वाचा: धर्मशाळेतील ढगफुटीत 'सुफी गायक मनमित सिंग' यांचा मृत्यु

2018 मध्ये हेली आणि जस्टीन यांनी लग्न केले होते. काही दिवसांपूर्वी लास वेगासमध्ये एका नाईट क्लबमध्ये जस्टिन बीबरचा स्टेज शो होता. तिथे तो त्याच्या पत्नीसमवेत गेला होता. यावेळी त्यानं आपल्या काही गाण्यांवर सादरीकरणही केले. जस्टिनशिवाय मेगन फॉक्स, मशीन गन केली आणि अंड्रा यांनीही यावेळी सादरीकरण केले.

loading image