Michael Douglas: भारतीय नव्हे तर 'या' हॉलिवूड कलाकाराचा 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारा'ने होणार सन्मान

IFFI Goa 2023: मायकेल डगलस यांना 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून याची घोषणा केली आहे.
Michael Douglas to receive the Satyajit Ray Excellence in Film Lifetime Award at IFFI Goa 2023
Michael Douglas to receive the Satyajit Ray Excellence in Film Lifetime Award at IFFI Goa 2023Esakal

Michael Douglas to receive the Satyajit Ray Excellence in Film Lifetime Award at IFFI Goa 2023: इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) हा फिल्म फेस्टिव्हल लवकरच सुरू होणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात हा फेस्टिव्हल पार पडणार आहे. यंदा या मोहत्सवाचे 54 वे वर्ष आहे.

यंदाच्या इफ्फीमध्ये प्रसिद्ध हॉलिवूड निर्माता मायकेल डगलस यांना 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर याबाबत माहिती दिली आहे.

Michael Douglas to receive the Satyajit Ray Excellence in Film Lifetime Award at IFFI Goa 2023
Dunki Vs Salaar: प्रभाससमोर बादशाह झुकला! सलारशी टक्कर टाळण्यासाठी शाहरुखने 'डंकी'ची रिलिज डेट ढकलली पुढे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. अनुरागने या पोस्टमध्ये लिहिले की, 'मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, हॉलिवूडचे महान अभिनेते आणि निर्माता मायकेल डगलस यांना 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

या ट्विटमध्ये ते पुढे लिहितात की, 'आपल्या देशावर त्यांचे नितांत प्रेम सर्वांना माहीत आहे. दक्षिण आशियातील सर्वात प्रमुख चित्रपट महोत्सवात त्यांची पत्नी कॅथरीन झेटा जोन्स आणि त्यांच्या मुलासह त्यांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.'

Michael Douglas to receive the Satyajit Ray Excellence in Film Lifetime Award at IFFI Goa 2023
Asian Academy Creative Awards: विजयची 'दहाड' जगाने ऐकली! सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर कोरलं नाव

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार, 1999 मध्ये 30 व्या IFFI मध्ये स्थापन करण्यात आला, ज्यांच्या विलक्षण योगदानामुळे चित्रपटसृष्टीच्या जगात लक्षणीयरित्या प्रगती होते अशा व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

Michael Douglas to receive the Satyajit Ray Excellence in Film Lifetime Award at IFFI Goa 2023
Vanita Kharat : महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील वनिता आता 'टॉलीवूड' मध्ये दिसणार, दाक्षिणात्य अंदाज एकदा पाहाच!

मायकेल डगलस कोण आहे?

79 वर्षीय अमेरिकन अभिनेता मायकेल डगलस यांनी दोन वेळा ऑस्कर आणि पाच वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आहेत. त्यांनी 1966 मध्ये 'कास्ट अ जायंट शॅडो' मधून आपल्या फिल्मी करकिर्दीला सुरुवात केली.

'वॉल स्ट्रीट', 'बेसिक इन्स्टिंक्ट', 'फॉलिंग डाउन' , 'द अमेरिकन प्रेसिडेंट', 'ट्रॅफिक' आणि 'बिहाइंड', कॅंडेलाब्रा' या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.

त्याचबरोबर त्यांनी 'वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट' , 'द चायना सिंड्रोम' , आणि 'द गेम' या चित्रपटांची निर्मीती केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com